Street Food Trend In 2022 : काठी रोल ते कच्छी दाबेली; देशभरात धुमाकूळ घालणारे स्ट्रीट फुड्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Street Food Trend In 2022

Street Food Trend In 2022 : काठी रोल ते कच्छी दाबेली; देशभरात धुमाकूळ घालणारे स्ट्रीट फुड्स

Street Food Trend In 2022 : जगात रस्त्यावरील म्हणजेच स्ट्रीट फुड लव्हर्सची आणि ते खाणाऱ्यांची संख्या कमी नाहीये. परंतु, २०२२ मध्ये काही स्ट्रीट फूड असे होते फूड लव्हर्सच्या ट्रेडिंगमध्ये होते. चला जाणून घेऊया २०२२ मध्ये नेमके कोणते पदार्थ होते ज्यांनी सर्वांना वेड करून सोडलं होतं.

हेही वाचा - Credit Score: असा वाढवा तुमचा ‘क्रेडिट स्कोअर’

हेही वाचा: Year Ender: २०२२ मध्ये या कलाकारांनी थाटला संसार

काठी रोल : तुम्ही खूप रोल खाल्ले असतील, पण काठी रोलसारखे काहीच नाही, कोलकाताचं हे प्रसिद्ध स्ट्रीट फूड २०२२ मध्ये ट्रेंडमध्ये होते. यामध्ये मीठ, मसाले आणि भाज्या टाकून ते तळून त्याचा रोल बनवला जातो.

नागोरी हलवा आणि बेदमी पुरी : चांदणी चौकात मिळणारा प्रसिद्ध नागोरी हलवा आणि बेदमी पुरी हे 2022 मधील सर्वाधिक मागणी असलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक होते. चांदणी चौकात जाणारा प्रत्येक जण तेथील पराठ्यांची चव चाखतातच पण, येथे मिळणारा नागोरी हलवा आणि बेदामी पुरीचीही चव न विसरता चाखतात. नागोरी पाणीपुरीपेक्षा थोडीशी मोठी असते. जी रव्यापासून बनवली जाते.

चांदणी चौकात मिळणारा प्रसिद्ध नागोरी हलवा आणि बेदमी पुरी हे 2022 मधील सर्वाधिक मागणी असलेल्या खाद्यपदार्थांपैकी एक होते. चांदणी चौकात जाणारा प्रत्येक जण तेथील पराठ्यांची चव चाखतातच पण, येथे मिळणारा नागोरी हलवा आणि बेदामी पुरीचीही चव न विसरता चाखतात. नागोरी पाणीपुरीपेक्षा थोडीशी मोठी असते. जी रव्यापासून बनवली जाते.

हेही वाचा: Yoga Trends In 2022 : निरोगी राहण्यासाठी 2022 मध्ये होता 'या' योगासनांचा ट्रेंड

दौलत की चाट : दौलत की चाट या नावावरूनच हा पदार्थ फक्त श्रीमंत लोकच खाऊ शकतात असे वाटू शकते. परंतु दौलत की चाटचा आणि श्रीमंतीचा काहीही संबंध नाही. हा पदार्थ दूध आणि मलईपासून निघालेला फोम आहे. 2022 मध्ये हा स्ट्रीट फूड म्हणून उदयास आला. चांदनी चौक येथे खेमचंद दौलत की चाट नावाचे एक लोकप्रिय ठिकाण असून, येथे तुम्ही या पदार्थाची चव चाखू शकता.

मिर्ची भजे : आरोग्याकडे बारकाईने लक्ष देणाऱ्या व्यक्ती फॅटी आणि तळलेले पदार्थ कमीत कमी खातात. मात्र, या वर्षी फूड लव्हर्सने मिर्चीची भजी अगदी आडवा हात मारत खाल्ली. या वर्षीच्या स्ट्रीट फूडमध्ये गरमागरम आणि मसालेदार स्नॅक्समध्ये मिरची पकोड्यांना अधिक मागणी होती.

हेही वाचा: Video : 'मुंबई सारखं स्ट्रीट फूड जगात कुठे नाही'

कच्छी दाबेली : महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फूड, कच्छी दाबेली जगभरात आवडीने खाल्ली जाते. कच्छी दाबेली पहिल्यांदा गुजरातच्या कच्छमध्ये बनवण्यात आली होती आणि त्यानंतर आजूबाजूच्या ठिकाणी त्याला पसंती मिळू लागली. याची क्रेझ इतकी आहे की, लोक नाश्ता आणि स्नॅक्स म्हणून हा पदार्थ अगदी मनापासून खातात.

छोले भटुरे : प्रसंग कोणताही असो, छोले भटुरे असणे अनिवार्य आहे. हा ट्रेंड कायम ठेवत २०२२ मध्येदेखील छोले भटुरे ट्रेंडिंगमध्ये होते. हा पदार्थ असा आहे जो लंच आणि डिनरमध्येही खाल्ला जाऊ शकतो.