Relationship Tips : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, कसे ओळखाल?

Relationship Tips : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, कसे ओळखाल?

Relationship Tips: कोणतेही नाते तेव्हाच टिकते जाते जेव्हा त्यात विश्वास आणि प्रामाणिकपणा असतो. नात्यामध्ये प्रेम नसेल तर ते नाते टिकू शकत नाही. जर नात्यामध्ये दोंघापैकी एकही जर निष्ठा बाळगत नाही तर दुसऱ्यासाठी स्वत:ला सांभळणे, नात्यामध्ये राहणे अवघड होऊन जाते. त्यामुळे तुम्हाला हे जाणून घ्यायला हवे की तुमचा पार्टनर तुम्हाला फसवत तर नाही ना?

Relationship Tips : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, कसे ओळखाल?
महिलांनो, बेल्ट लूकने मिळेल तुमच्या व्यक्तीमत्वाला हटके लूक

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत तर नाही ना? कसे ओळखाल (what are the signs of cheater partner)

जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत नात्यामध्ये फसवणूक होते त्यावेळी तो शारिरीक आणि मानसिकरित्या मोठा धक्का बसतो. असे व्यक्ती स्वत:ला दोष देत राहतात आणि त्यांच्या मनातर एकच प्रश्न असतो की अस का घडलं? नात्यामध्ये होणारी फसवणूक आता सामान्य गोष्ट झाली आहे. आजच्या काळात कोणोसोबतही विश्वासघात होऊ शकतो. जर तुम्हाला तुमच्या जोडीदारावर संशय असेल तर तुम्हाला फसवत नाही हे कसे ओळखाल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • रिलेशनशिपमध्ये नेहमी बहूतेक लोक आपल्या जोडीदाराची कोणत्याही परिस्थितीमध्ये साथ देतात. पण तुमचा जोडीदार जर तुम्हाला संकटकाळात साथ देत नसेल तर तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे हे लक्षात घ्या. जो गरज असताना साथ देत नसेल तो आयुष्यभर तुमची काय साथ देणार? तुमचा जोडीदाराला जर तुमची काळजीच नसेल किंवा त्याचा स्वभाव बदलला असेल तर कदाचित त्याचे तुमच्यावर प्रेम नाही.

  • नात्याच्या सुरूवातीस चांगला वागणारा जोडीदार अचानक वेगळाचा वागू लागला तर सावध व्हा. तुम्हाला रोज भेटणारा जोडीदार अचानक न भेटण्याची कारणे शोधत असेल तर त्याचा अर्थ असा आहे की, त्याला तुमच्याबाबत, नात्याबाबत आधीसारखी ओढ राहिली नाही. तुमच्या भावनांसोबत खेळणारा जोडीदार नेहमी तुमच्याच प्रेमाची परीक्षा घेत असेल तर तो खोटं वागत आहे हे लक्षात घ्या.

Relationship Tips : तुमचा जोडीदार तुम्हाला फसवतोय का, कसे ओळखाल?
अभिनेत्रीच्या चार महिन्यांच्या मुलाला कोरोना; सांगितला हृदयद्रावक अनुभव
  • नात्याच्या सुरुवातीस एकमेकांसोबत राहण्यासाठी दोघही कारण शोधत होता आणि आता तर हे सगळ फक्त तुमच्या बाजूने होत असेल आणि तुम्ही प्रयत्न करूनही तुमचा जोडीदार तुमच्यापासून दूर जात असेल तर कदाचित त्याला आता हे नातं नको आहे. तरीही तो तुम्हाला खोटं प्रेम दाखवत असेल तो तुम्हाला फसवू शकतो.

  • तुम्हा अचानक एखाद्यासोबत तुमच्या जोडीदाराला बोलताना पाहिले आणि तुम्ही विचारल्यानंतर फक्त फ्रेंन्ड आहे असे उत्तर मिळाले तर घाबरून जाण्याची गरज नाही. पण तो तुमची त्याच्यासोबत ओळख करून देत नसेल किंवा त्याच्याबद्दल कोणतीच गोष्ट तुम्हाला सांगत नसेल तर फ्रेन्ड खूपच खास असू शकतो आणि कदाचित तो तुमचा विश्वासघात करू शकतो.

  • तुमचा जोडीदार तुमच्यापासून आपला सोशल मिडिया अकाऊंट पासवर्ड लपवत असेल तर कदाचित तो तुम्हाला फसवू शकतो आणि दुसऱ्या जोडीदाराच्या संपर्कात शकतो.

  • त्यामुळे कदाचित तो तुम्हाला तुमचा सोशल मिडिया पासवर्ड सांगत नसेल. आजच्या काळात खूप लोक सोशल मीडियावर जोडीदार बनवितात. तेच जर तुमचा जोडीदार आपल्या मोबाईलचा पासवर्ड लपवत असेल तर कदाचित मोबाईलमध्ये काहीतरी असू शकते जे तुम्हाला आजिबात पटणार नाही. नात्यामध्ये विश्वास असेल तर जोडीदार एकमेकांसोबत सगळ शेअर करतात,अगदी पासवर्ड सुध्दा. बहूतेक लोक असे तेव्हाच वागतात जेव्हा त्याच्या आयुष्यात एका पेक्षा जास्त जोडीदार असतात.

  • तुमचा जोडीदार जर नेहमी तुम्ही त्यांच्यावर चूकीचे वागला आहात आणि तेच व्हिक्टिम आहे असे दाखवतात. मग चूक कोणाचीही असे असली तरी जर तुम्हालाच माफी मागावी लागत असेल तर सावध राहा. तुमचा जोडीदार तुमच्यावर प्रेम करत नाही हे स्पष्ट आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com