
Tribute to Pulwama Soldiers: आज पुलवामा हल्ल्याला 6 वर्षे पूर्ण झाली आहे. 14 फेब्रुवारी 2019 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक काळा दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले. हा दिवस भारतीय कधीच विसरू शकत नाही. केंद्रीय राखीव पोलिस दलाचा (CRPF) ताफा जम्मूहून श्रीनगरला जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर-राष्ट्रीय महामार्गावरून जात होता. दरम्यान, अवंतीपोरा येथील गोरीपोराजवळ, ताफ्यात सहभागी असलेल्या बसेसच्या अगदी शेजारी एक वाहन जात होते. लष्कराचे जवान वारंवार गाडी स्वाराला ताफ्यापासून दूर राहण्यास सांगत होते. पण गाडीवाला या सुचनेकडे दुर्लक्ष करत होता. सैनिकांना काही समजण्यापूर्वीच गाडीने ताफ्यातील बसला धडक दिली. त्यानंतर एक मोठा स्फोट झाला आणि या हल्ल्यात ४० सैनिक शहीद झाले.