खरंच किती वेळ च्युइंगम चघळावा, माहिती नसल्यास होऊ शकतं मोठं नुकसान

Side Effects of Chewing Gum for long time: पण असे नाही की च्युइंगमचे फक्त फायदे आहेत, त्याचे काही तोटे देखील आहेत. जेव्हा तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ च्युइंगम चघळता तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
Side Effects of Chewing Gum for long time:
Side Effects of Chewing Gum for long time:Sakal

Side Effects of Chewing Gum for long time: अनेकांना च्युइंगम खायला खुप आवडते. विशेषतः आजच्या मुलांना च्युइंगम खायला आवडते. च्युइंगम खाणे आपल्या आरोग्यासाठी चांगले असते, असेही तज्ज्ञ सांगतात. ते चघळल्याने दात किडन्याचा धोका कमी होतो आणि आपले जबडे सक्रिय होतात, ज्यामुळे ते मजबूत राहतात.

याशिवाय तोंडातील खराब बॅक्टेरियाचे प्रमाण ७५% कमी होते. तसेच जेवणानंतर च्युइंगम चघळल्याने लाळेचा प्रवाह वाढतो. हे हानिकारक शर्करा फिल्टर करण्यास मदत करते, जे तुमच्या तोंडातील बॅक्टेरियांना खाद्य देतात.

म्हणूनच दंतवैद्य दातांच्या समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना च्युइंगम चघलळण्याचा सल्ला देतात. पण असे नाही की च्युइंगमचे फक्त फायदे आहेत, त्याचे काही तोटे देखील आहेत. जेव्हा तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ च्युइंगम चघळता तेव्हा अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यामुळे च्युइंगम किती वेळ चघळावे हा जाणून घेणे गरजेचे आहे.

किती वेळ चघळावे च्युइंगम?

डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, जर च्युइंगम खाल्ल्याने दातांची किड कमी होऊ शकते तर शुगर फ्री च्युइंगमचे सेवन करावे. एक च्युइंगम १५ मिनिटं चघळावे. नंतर तो तोंडातून काढून टाकावा. च्युइंगममुळे तुम्हाला अनेक फायदे मिळतात आणि तुमच्या चेहऱ्याचे स्नायू मजबूत होतात, पण जास्त वेळ च्युइंगम चघळल्याने तुमच्या दातांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

तज्ज्ञांचे मत काय आहे?

काही तज्ज्ञांच्या मते जर एखादी व्यक्ती जास्त वेळ च्युइंगम चघळत असेल तर त्यामुळे दातांचा वरचा थर, ज्याला इनॅमल म्हणतात तो कमी होऊ शकतो. यामुळे दातांमध्ये डिमिनेरलायझेशन होते. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या दातांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल च्युइंगम खाण्यापूर्वी दंतवैद्याचा सल्ला घ्यावा.

Side Effects of Chewing Gum for long time:
Allergy: घरातील 'या' गोष्टींमुळे वाढू शकते अ‍ॅलर्जी, अशी घ्या काळजी

कोणते नुकसान होऊ शकतात?

तासंतास च्युइंगम चघळल्यास हिरड्या कमजोर होऊ शकतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एकच च्युइंगम तासंतास चघळल्याने टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट्स (TMJ) चा त्रास असलेल्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. टीएमजे हे दोन सांधे आहेत जे खालच्या जबड्याला कवटीला जोडतात. त्यामुळे तासंतास च्युइंगम चघळू नका आणि जर तुम्हाला रोज च्युइंगम खायला आवडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com