Delusional Love Disorder : 'असं वाटतं कॉलेजमधील सगळ्या मुली माझ्या प्रेमात..', तरुणाला झाला विचित्र आजार; डॉक्टर म्हणतात..

China Boy Delusional Love : फेब्रुवारीमध्ये त्याला हे भ्रम होण्यास सुरुवात झाली होती. त्याने वर्गातील मुलींना प्रपोज करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला नकार मिळू लागला.
Delusional Love Disorder
Delusional Love DisordereSakal

What is Delusional Love Disorder : सध्या चीनमधील एक वीस वर्षीय तरुण चांगलाच चर्चेत आहे. विद्यापीठात दुसऱ्या वर्षाला शिकणाऱ्या या तरुणाला असं वाटत होतं, की वर्गातील सर्व मुली त्याच्या प्रेमात आहेत. त्याचा हा भ्रम एवढा वाढला, की तो अगदी उघडपणे आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करू लागला. वर्गातील मुलींनी त्याला कशीही वागणूक दिली, तरी ते प्रेमापोटीच असल्याचं त्याला वाटत होतं. अखेर या भ्रमाचं रुपांतर मानसिक आजारात झालं.

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, लिऊ असं या तरुणाचं नाव आहे. फेब्रुवारीमध्ये त्याला हे भ्रम होण्यास सुरुवात झाली होती. त्याने वर्गातील मुलींना प्रपोज करण्यास सुरुवात केली. मात्र त्याला नकार मिळू लागला. मात्र, त्या मुली केवळ लाजत असल्यामुळे आपल्याला नकार देत असल्याचं लिऊला वाटत होतं. लिऊला झालेला आजार हा 'डिल्युजनल लव्ह डिसऑर्डर' असल्याचं त्याच्या डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

"कॉलेजमधील सर्व मुलींना मी आवडतो. मी कॉलेजमधील सगळ्यात हँडसम मुलगा आहे." असं लिऊने डॉक्टरांना सांगितलं होतं. डॉ. लू झेंजिआओ यांनी याबाबत माहिती दिली. त्याचा हा भ्रम जसा वाढत गेला, तसा त्याच्या वर्गमित्रांना त्याचा त्रास होऊ लागला, असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून, त्यामध्ये सुधारणा दिसत असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं.

Delusional Love Disorder
Nomophobia : खिशात मोबाईल नसेल तर तुम्हीही दचकता? होऊ शकते 'नोमोफोबिया'ची लागण.. काय आहे हा आजार?

कोणती लक्षणं दिसली?

  • सर्व मुलींना आपण आवडत असल्याचं त्याने आपल्या मित्रांना सांगितलं होतं.

  • त्याने अधिकाधिक मुलींकडे आपलं प्रेम व्यक्त केलं. त्यांनी नकार दिल्यानंतर देखील त्या आपल्यावर प्रेम करत असल्याचं त्याला वाटत होतं.

  • अचानक त्याचं वर्गातील लक्ष कमी झालं होतं, अभ्यासातही तो अचानक भरपूर मागे पडला.

  • त्याचं रात्रीचं झोपणंही बंद झालं होतं. तो रात्र-रात्र जागून सर्व मुलींचा विचार करत.

  • त्याचा स्वतःवरील आणि इतरांवरील खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला होता.

कशामुळे होतो हा आजार?

डॉ. लू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आजार मार्च आणि एप्रिल या दरम्यान दिसून येतो. या काळात वातावरणात झालेल्या बदलामुळे शरीरातील एंडोक्राईन स्तर (Endocrine Levels) खालीवर होऊ शकतो. यामुळे हायपर होणे, झोप न येणे आणि सेक्स अ‍ॅडिक्शन अशी लक्षणं दिसून येतात.

Delusional Love Disorder
Popcorn Brain : सोशल मीडियामुळे पसरतोय 'पॉपकॉर्न ब्रेन' आजार; काय आहेत लक्षणं अन् कसा करायचा बचाव?

काही प्रकरणांमध्ये रुग्णांना Erotomanic Delusion ची लागण होते. यामुळे एक किंवा अनेक व्यक्तींना आपल्याबद्दल रोमँटिक फीलिंग्स आहेत असा भ्रम रुग्णांना होऊ शकतो. यामध्ये काहींना असंही वाटतं की इतर व्यक्ती आपल्यावर सीक्रेटली प्रेम करतात. काही प्रकरणांमध्ये हे रुग्ण आक्रमक होऊन इतरांवर हल्ले देखील करू शकतात असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com