Sleep Divorce म्हणजे काय? ज्याच्या मदतीने जोडपी नातं सुधारण्याचा प्रयत्न करतात, याची गरज कुठे पडते? जाणून घ्या

अमेरिकन संस्था नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या मते, सुमारे 12 ते 25 टक्के जोडपी वेगवेगळे झोपतात, परंतु त्यांच्या समस्या ते एकमेकांना सांगू शकत नाहीस
Sleep Divorce
Sleep Divorceesakal

Sleep Divorce : घटस्फोटाबाबत तुम्ही ऐकल आहेच. आणि तुम्हाला त्याचा अर्थही माहिती आहे. पण तुम्हाला स्लीप डिवॉर्स म्हणजे काय हे माहिती होत काय? पश्चिमी देशांमध्ये याचा ट्रेंड दिसून येतो. अमेरिकन संस्था नॅशनल स्लीप फाऊंडेशनच्या मते, सुमारे 12 ते 25 टक्के जोडपी वेगवेगळे झोपतात, परंतु त्यांच्या समस्या ते एकमेकांना सांगू शकत नाहीस.

स्लीप डिवॉर्स म्हणजे काय?

स्लीप डिवॉर्स एक अॅग्रीमेंट आहे ज्यात कपल्स एकत्र झोपण्याऐवजी वेगवेगळ्या खोल्या, बेड आणि वेगळ्या वेळेची मदत घेतात. जोडप्याच्या नात्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, असे विचारल्यावर तुम्हाला याची प्रत्येक जोडप्याकडून वेगवेगळी उत्तरे मिळतील. पण झोपेचा उल्लेख क्वचितच कोणी करेल.

हे जोडपे एका बेडरूममध्ये राहतात. त्यापैकी एक रात्रभर घोरतो किंवा दुसरा रात्रभर लॅपटॉपवर घुटमळत राहतो. अशावेळी दोघांचीही झोप पूर्ण होत नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी क्षुल्लक कारणावरून दोघांचीही भांडणं होतात. आता हे भांडण टाळण्यासाठी स्लीप डिवॉर्सचा ट्रेंड वाढला आहे. Tiktok – sleepdivorce वर एक हॅशटॅग ट्रेंड करत आहे, जो 3.5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

स्लीप डिवॉर्सचा ट्रेंड व्हिक्टोरियन काळातही होता

स्लीप डिवॉर्स हा शब्द तुम्हाला ऐकायला नवीन वाटत असेल, पण त्याची प्रथा खूप जुनी आहे. 1850 सालापासून पुढची 100 वर्षे पती-पत्नी एकाच खोलीत राहायचे, मात्र हॉटेल्समध्ये ट्विन शेअरिंग बेड असायचे. म्हणजे एकाच रूममध्ये दोन बेड.

ही व्यवस्था यासाठी करण्यात आलेली होती जेणेकरून जोडपी त्यांची वेगवेगळी कामे त्यांच्या वेळेत स्वतंत्रपणे काम करून एकमेकांना डिस्टर्ब न करता त्यांच्या वेळेत झोपू शकतात.

लँकेस्टर युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर हिलरी हिंड्स यांच्या मते, 19व्या शतकात ट्विन बेड-शेअरिंग संकल्पना आली, जेणेकरून पती-पत्नी एकत्र राहू शकतील आणि शांतपणे झोपू शकतील. हिंड्सने त्यावर एक पुस्तकही लिहिले - कल्चरल हिस्ट्री ऑफ ट्विन बेड्स. यामध्ये त्यावेळचे डॉक्टर बेड शेअर केल्याने होणारे मानसिक नुकसान सांगायचे.

बेड हायजिनचा संदर्भ

1861 मध्ये, हेल्थ कँपेनर आणि डॉक्टर विल्यम विटी हॉल यांनी 'स्लीप- ऑर हाइजीन ऑफ द नाइट' नावाचे पुस्तक लिहिले, ज्यामध्ये बेड शेअर करण्याचे तोटे सांगितले होते. यामध्ये हॉल यांनी स्वच्छ पलंगावर एकटेच झोपण्याचा सल्ला दिला आहे.

अगदी त्याचप्रमाणे ज्याप्रमाणे आपण दात स्वच्छ ठेवतो आणि नखे कापतो. त्यांचा युक्तिवाद असा होता की जर पूर्णपणे भिन्न वयोगटातील किंवा भिन्न दिनचर्या असलेल्या दोन व्यक्तींना एकत्र झोपवले तर त्यांच्या झोपेवर वाईट परिणाम होतो. किंवा असे होऊ शकते की दोघांना पुरेशी झोप येत नाही.

Sleep Divorce
Divorce Case : अखेर नोकरी नसलेल्या पतीला पोटगी देण्यास पत्नी तयार! घटस्फोटाचा दावा निकाली

अपूर्ण झोपेने त्रस्त लोक

झोप न लागणे हे अपूर्ण झोपेमागचे एक कारण असू शकते. गेल्या वर्षी, वेकफिट या स्लीप सोल्यूशन्स कंपनीने ग्रेट इंडियन स्लीप स्कोअरकार्ड (GISS) 2022 जारी केले. त्यामधून असे पुढे आले की भारतातील 55 टक्क्यांहून अधिक लोक रात्री 11 नंतरच झोपतात आणि 8 तासांपेक्षा कमी झोप न घेता जागे होतात. (Divorce)

झोपेच्या कमतरतेमुळे कित्येक तरुण जोडप्यांमध्ये समस्या वाढताय. मात्र यात कुठलीही नवीन आकडेवारी पुढे आलेली नाही, परंतु हेल्थ टेक्नॉलॉजी कंपनी फिलिप्स इंडियाचा 2019 डेटा सांगतो की सुमारे 93% भारतीयांना पुरेशी झोप मिळत नाही. यापैकी 58% लोक 7 तासांपेक्षा कमी झोप घेतात.

Sleep Divorce
Divorce Temple Viral News : जगातलं सगळ्यात अनोखं 600 वर्ष जूनं मंदिर, महिलांशी आहे खास संबंध

कमी झोपण्याचा प्रभाव तुमच्या झोपेवरही होतो

झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम नातेसंबंधांवर होतो. अपूर्ण झोपेमुळे शुल्लक कारणांवरूनही जोडपी भांडतात. यासोबतच जोडप्याच्या जवळीकवरही परिणाम होतो. यामुळेच वेगवेगळ्या वर्क प्रोफाईल असलेले पती-पत्नी वेगळ्या बेडरूममध्ये किंवा वेगवेगळ्या वेळी झोपणे पसंत करतात. (Lifestyle)

याशिवाय इतरही अनेक कारणे आहेत. एखादे जोडपे घोरतात, तर एखाद्याला वारंवार वॉशरूममध्ये जाण्याची सवय असते किंवा रात्री उशिरापर्यंत झोपायला आवडते, त्यामुळे स्लीन डिवॉर्सचा ट्रेंड वाढत चाललाय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com