Sunscreen अन् Moisturizer मध्ये नेमका फरक काय तुम्हाला ठाऊक आहे काय? वाचा एका क्लिकवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Suncreen vs Moisturizer

Sunscreen अन् Moisturizer मध्ये नेमका फरक काय तुम्हाला ठाऊक आहे काय? वाचा एका क्लिकवर

Skin Care: त्वचेची निगा राखण्यासाठी आपण वेगवेगळे ब्यूटी प्रोडक्ट्स वापरत असतो. त्वचेला टॅनिंगपासून वाचवण्यासाठी आपण कधी आपण सनस्क्रिन लावतो तर कधी आपण मॉश्चरायझर लावतो. पण हे दोन्ही प्रोडक्ट लावताना यातील कुठली क्रिन कधी फायदेदायी असते ते तुम्हाला ठाऊक आहे काय? चला तर यातील फरक जाणून घेऊया.

मॉइश्चरायझर म्हणजे काय?

आपल्या त्वचेला ड्रायनेसपासून वाचवण्यासाठी आणि त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यासाठी आपण मॉइश्चरायझर वापरतो. हिवाळ्यात आपली त्वचा सर्वाधिक कोरडी पडत असल्याने आपण मॉइश्चरायझरचा सर्वात जास्त वापर करतो. मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार वापरू शकता. ते सहसा अंघोळीनंतर व झोपण्याआधी लावले जाते. सनस्क्रीन लावण्यापूर्वी मॉइश्चरायझरचा वापर केला जातो.

सनस्क्रिनचा वापर कधी करावा?

सनस्क्रीन ही अशी क्रीम आहे जी आपण टॅनिंग आणि सूर्यापासून हानिकारक किरण टाळण्यासाठी लावतो. आपल्या शरीराचे जे भाग सूर्यप्रकाशामुळे प्रथम टॅन होतात त्या भागांवर आपण सनस्क्रीनचा वापर करतो. जसे की चेहरा, हात, मान आणि पाठ. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावले जाते आणि मग त्यावर सनस्क्रीन लावले जाते. सनस्क्रीनला सनब्लॉक, सनबर्न क्रीम आणि सनटॅन लोशन असेही म्हणतात.

सनस्क्रिन की मॉइश्चरायझर दोघांपैकी काय चांगले?

या दोन्ही क्रीमना स्वत:चे महत्त्व आहे. एक क्रीम आपल्या त्वचेला मॉइश्चरायझ करते आणि दुसरे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते. जर तुमची त्वचा कोरडी नसेल तर तुमच्यासाठी सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे. पण जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही दोन्ही वापरावे. बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावायला विसरू नका. आपण उन्हाळ्यात तसेच हिवाळ्यात सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे.