esakal | शाळेतल्या मुली थ्रेडिंग,वॅक्सिंगसाठी हट्ट करतायेत? आईंनी करून पहा 'हे' उपाय
sakal

बोलून बातमी शोधा

waxing

शाळेतल्या मुली थ्रेडिंग,वॅक्सिंगसाठी हट्ट करतायेत?

sakal_logo
By
शर्वरी जोशी

सध्याच्या काळात सौंदर्याची परिभाषा बदलली आहे. लोकांना जे दिसतं तेच बाह्यसौंदर्य खरं असतं असा समज अनेकांचा आहे. त्यामुळे अनेक तरुण मुली किंवा स्त्रिया त्यांच्या सौंदर्याबाबत जास्तच सजग झाल्याचं पाहायला मिळतं. यासाठी अनेक जणी त्यांच्या पर्सनालिटीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतात. तर, काही जण ब्युटीपार्लर किंवा महागडी सौंदर्य प्रसाधने खरेदी करुन चेहऱ्यावरील सौंदर्य खुलवतात. विशेष म्हणजे मेकओव्हरची ही क्रेझ केवळ तरुणींमध्येच नव्हे तर १५-१६ वर्षांच्या मुलींमध्येही पाहायला मिळते. त्यामुळे अनेक लहान मुली आता ब्युटीपार्लरची पायरी चढू लागल्या आहेत. यात असंख्य जणी आतापासूनच थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करु लागल्या आहेत. परंतु, इतक्या लहान वयात असे उपाय करणं पुढे त्यांनाच त्रासदायक ठरु शकतं. म्हणूनच, वयाच्या कोणत्या वर्षापासून थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करावं ते जाणून घेऊयात. (what-is-the-prefect-age-to-start-waxing)

हेही वाचा: 'या' गोष्टींमुळे नात्यातील गमावलेला विश्वास पुन्हा मिळवा

१. मुलींना थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग का करावंस वाटतंय हे प्रथम जाणून घ्या.

अनेक मुली त्यांच्या मेकओव्हरची सुरुवात थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करण्यापासून करतात. विशेष म्हणजे शाळेतील किंवा फ्रेंड सर्कलमधील २-३ मुलींनी हा प्रयोग केला असेल तर अन्य मुलीदेखील आईकडे पार्लरमध्ये जाण्याचा अट्टाहास करतात. परंतु, हा अट्टाहास अत्यंत चुकीचा आहे. त्यामुळे आईने किंवा मोठ्या बहिणीने मुलींना समजावलं पाहिजे. त्यांच्या स्कीनसाठी हे प्रकार या वयात करणं किती घातक आहे हे नीट समजावून सांगितलं पाहिजे.

२. पुढील समस्यांचा विचार करा -

अनेकदा मुलींचा हट्ट पूर्ण करण्यासाठी स्त्री मुलींना घेऊन ब्युटीपार्लरमध्ये जातात. मात्र, थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग केल्यानंतर ठराविक काळाने पुन्हा त्या जागी नवीन केस येण्यास सुरुवात होते. त्यामुळे दरवेळी हे थ्रेडिंग किंवा वॅक्सिंग करावं लागतं. त्यामुळे मग तुम्ही मुलींना अडवू शकत नाही. त्यामुळे लहान वयात मुलींना ही परवानगीच देऊ नका. त्यामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही.

उलटपक्षी, जर मुलींना खरंच हेअर रिमुव्हरची गरज असेल तर प्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. तसंच ब्युटीपार्लरमध्ये जाण्यापेक्षा त्याला पर्याय म्हणून असलेल्या हेअर रिमुव्हर क्रिम किंवा अन्य उपाय मुलींना उपलब्ध करुन द्या.

loading image
go to top