Toxic Masculinity म्हणजे काय? पुरुषांवर कसा होतो परिणाम, जाणून घ्या

टॉक्सिक मस्कुलिनिटीचा पुरुषांवर एक निश्चित पध्दतीने वापरू शकतात. पुरुषत्व आणि वर्चस्व यावर जोर देते.
Toxic Masculinity म्हणजे काय? पुरुषांवर कसा होतो परिणाम, जाणून घ्या

Know About Toxic Masculinity : मर्द को कभी दर्द नही होता, मेहनतीचे काम पुरुषांनीच केले पाहिजे, वंश पुढे नेण्यासाठी मुलगा गरजेचा आहे, पुरुषच घर चालवितो, महिला दासी आहे आणि पुरुष स्वामी आहे ...... अशा कित्येक गोष्टी आणि पुरुषी वर्चस्व सांगणाऱ्या कल्पना आजही आपल्या समाजात स्वीकारल्या जात आहेत. सन 2018 मध्ये #MeTOo कॅम्पेन अंतर्गत या विचाराला ‘ टॉक्सिक मस्कुलिनिटी (Toxic Masculinity)’ असे म्हटले आहे. त्यावेळी या शब्दाचा खूप वापर झाला होता. टॉक्सिक (Toxic) हे विशेषण आहे ज्याचा अर्थ विषारी असा होता.

फेमिनिज्म इंडिया डॉटकॉममध्ये छापलेल्या बातमीनुसार, टॉक्सिक मस्कुलिनिटी (toxic masculinity) ही वर्तणूक आणि स्वभावाचा एक भाग आहे जो सांस्कृतिकदृष्ट्या पुरुषांसोबत जोडला जातो म्हणजे पुरुषत्वाची व्याख्याच अशी केली आहे की जेणेकरुन पुरुषांना श्रेष्ठ असल्याचा दावा करण्यासाठी पुरुषत्व आणि त्यांच्या वर्चस्वावर भर दिला जातो. सोप्या भाषेमध्ये सांगायचे झाले तर, ही कल्पना महिलांना कमी लेखणारी आणि पुरुषाला श्रेष्ट मानणारी आहे. ' टॉक्सिक मस्कुलिनिटी (Toxic Masculinity)' हा शब्द समाजाच्या 'पुरुषत्व, पितृसत्तात्मक व्याख्येतून निर्माण होतो,ज्यामध्ये असे म्हटले आहे की, ''पुरुषांनी त्यांचे पुरुषत्व अशा प्रकारे प्रदर्शित केले पाहिजे जे प्रभावी आणि स्त्रीविरोधी भूमिका प्रतिबिंबित करते.''

पुरुषांनी नेहमी अवघड काम केले पाहिजे, विशेषत: महिला आणि इतरांच्या तुलनेत, ज्यांना कमी लेखले जाते आणि भावनिक मानले जाते. पुरुषत्व मुळात टॉक्सिक ' किंवा चुकीचे नसते, परंतु 'पुरुषत्वाच्या नावाखाली काही सामाजिक प्रतिगामी गुणधर्माचा पुरुष आणि समाजावर खोल परिणाम होतो, ज्यामुळे पुरुषत्व टॉक्सिक होते.

Toxic Masculinity म्हणजे काय? पुरुषांवर कसा होतो परिणाम, जाणून घ्या
Video: पुण्याच्या ग्रामीण भागात पीएमपीएमएल सुसाट

टॉक्सिक मस्कुलिनिटी म्हणजे काय?

"टॉक्सिक मस्कुलिनिटी(toxic masculinity)म्हणजे पुरुषत्वाशी संबंधित काही हानिकारक सांस्कृतिक आणि सामाजिक नियमांचा toxic masculinity) संदर्भ, जसे की कठोर वागणे किंवा वर्चस्व गाजवणे, हिंसक प्रवृत्ती आणि वर्तणूकीला प्रोत्साहन देणे आणि स्वत:च्या भावना किंवा दुःख दडपून टाकणे. हे शब्द हे दर्शवत नाहीत की, पुरुषत्व स्वतःच "टॉक्सिक (toxic) आहे, परंतु हे पुरुषत्वाशी संबंधित हानिकारक नियमांचे सामान्यीकरण आहे.''

Toxic Masculinity म्हणजे काय? पुरुषांवर कसा होतो परिणाम, जाणून घ्या
पुणे : साठीतील सायकलवीरांचा पुणे ते सुंदरबन सायकल दौरा

पुरुष आणि समाजावर प्रभाव

टॉक्सिक मस्कुलिनिटी अनेकदा फक्त इतरांसाठी हानिकारक मानले जाते. पण, सर्वात आधी त्याचे बळी पुरुषच ठरतात, ज्यामुळे ते त्यांच्या पारंपारिक पुरुषत्वाच्या कल्पनेला चिकटून राहतात आणि ही कल्पना जे मानत नाहीत त्यांनाही या सर्वाचे नकारात्मक परिणाम अनुभवावे लागतात.

पुरुषही असतात दबावाखाली

टॉक्सिक मस्कुलिनिटी पुरुषांवर विशिष्ट पद्धतीने वागण्याचा दबाव टाकते. स्थैर्य असणे आणि एक चांगला कर्ता होण्याचा ताण पुरुषांना दीर्घकाळ सहन करावा लागतो. त्यामुळे पुरुषांना उच्च रक्तदाब, नैराश्य आणि चिंता याचा त्रास होऊ शकतो. तसेच पुरुषांमध्ये दारूचे सेवन, आत्महत्या आणि मानसिक हानी होण्याचा धोका असतो, कारण भावनांवर स्वतंत्रपणे चर्चा करणे हे पारंपारिक पुरुषत्वाच्या मानकांच्या विरुद्ध आहे. तसेच, कमी लेखण्याच्या भीतीने, त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी व्यावसायिक मदत घेण्याची शक्यता कमी असते.

Toxic Masculinity म्हणजे काय? पुरुषांवर कसा होतो परिणाम, जाणून घ्या
२२ महिलांनी केला रायगडवरील हिरकणी कडा सर

या विचारांना हिंसेचे स्वरूप देते

टॉक्सिक मस्कुलिनिटीमुळे महिलांवर लैंगिकदृष्ट्या विजय मिळवणे, लैंगिक गुन्ह्यांच्या चूकीच्या संस्कृतीला बळकटी देते. ही मानसिकता लैंगिक गुन्हेगारांना दोषी न ठरवणे आणि गुन्हेगाराला वाचवण्यास देखील प्रोत्साहन देते. ही समस्या सोडवण्यासाठी शत्रुत्व आणि हिंसाचार वापरणे योग्य आहे अशी शिकवण पुरुषांना ही मानसिकता देते. सामान्यत: पुरुषांच्या हिंसेचे शिकार महिला आणि ट्रान्सजेंडर लोक बळी ठरतात. परिणामी, घरगूती हिसाचार, लैंगिक गुन्हा, बंदूक हिंसा, ऍसिड हल्ले आणि टॉक्सिक मस्कुलिनिटीमुळे प्रोत्साहीत अन्य स्वरुपांच्या हिंसा आपल्याला पाहायला मिळते.

यामुळे पुरुषांवर दबाव येतो ज्यांच्याकडे या "पुरुषी" वैशिष्ट्यांचा अभाव आहे. या मर्यादित प्रवृत्तींना नकार देणारे पुरुष अपुरे आणि दुबळे वाटू शकतात. त्यांच्याकडे पुरुषत्व कमी असल्याच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते आणि ते सामाजिकदृष्ट्या त्यांच्यावर बहिष्कार टाकला जातो.

जे लोक, विशेषत: किशोरवयीन मुलांमध्ये, पुरुषत्व म्हणजे काय या प्रस्थापित चौकटीत बसत नाहीत, त्यांना नाकारले जाऊ शकते. सर्व जाती आणि वंशाच्या पार्श्वभूमीच्या मुलांनी 'पुरुषत्वा प्रमाणे' मुलांनी कृती केली नाही तर त्यांना शाळेत छळाचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे समवयस्कांपासून विलगीकरण आणि एकाकीपणाचा सामना त्यांना करावा लागतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com