

otitala naral
esakal
आपल्याकडे अनेक परंपरा वर्षानुवर्षे चालत आलेल्या आहेत. हिंदू धर्मात कोणतंही नवीन कार्य असेल किंवा पूजा विधी असेल त्यात नारळाला अनन्यसाधारण महत्व आहे. त्यात नारळाचा वेगवेगळ्या नावाने उपयोग केला वाजतो. कधी नारळ तर कधी श्रीफळ. श्रीफळ हे सगळ्या देवांना प्रिय मानलं जातं. श्रीफळ मधल्या श्रीचा अर्थ म्हणजे लक्ष्मी. घरात एखादं कार्य असेल तर आपल्याकडे देवापुढे नारळ, सुपारी, विड्याची पानं ठेवण्याची प्रथा आहे. तर स्त्रियांची ओटी भरतानाही श्रीफळ वापरलं जातं. मात्र ओटीमध्ये मिळालेल्या या श्रीफळाचं करायचं काय?