
छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक महान योद्धे आणि रणनीतीकार नव्हते, तर त्यांची शिस्तबद्ध जीवनशैली आजही लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या अपराजित युद्धकौशल्यामागे त्यांचे उत्तम आरोग्य आणि संतुलित आहार यांचा मोठा वाटा होता. शिवरायांनी आरोग्य आणि युद्धकौशल्य यांच्यातील नातं ओळखून आहाराला विशेष महत्त्व दिलं होतं. त्यांच्या आहारातील शिस्त आणि पौष्टिकता यामुळे ते आणि त्यांचे सैन्य नेहमीच तंदुरुस्त राहिले. या लेखात आपण शिवाजी महाराजांच्या आहाराचे रहस्य आणि त्यामागील शास्त्र जाणून घेऊया.