Relationship Tips | महिलांना पुरूष जोडीदाराकडून हव्या असतात या ४ गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Relationship

Relationship Tips : महिलांना पुरूष जोडीदाराकडून हव्या असतात या ४ गोष्टी

मुंबई : आजतागायत पुरूष महिलांना पुरेसे समजू शकलेले नाहीत. रात्रंदिवस आपल्या जोडीदारासोबत राहूनही बहुतेकांना आपल्या पत्नीला किंवा गर्लफ्रेंडला त्यांच्याकडून काय हवे आहे हे माहीत नसते.

आज आपण महिलांच्या अशा काही अपेक्षा पाहू या ज्या पुरुषांना माहीत असणे आवश्यक आहे. हेही वाचा - भारतीय क्रिकेटची नवी आशा- पृथ्वी शाॅ

पाठिंबा

आजच्या महिला सुशिक्षित आहेत आणि बऱ्याचदा त्यांनी स्वत:ला शारीरिकदृष्ट्याही सक्षम बनवलेले असते. त्या आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेल्या आहेत.

फक्त ही परिस्थिती पुरुषांनी मान्य केली नाही तर घरात वादविवाद होतात. त्यामुळे पुरुषांनी बदललेल्या परिस्थितीचा आदर करत पाठिंबा द्यावा असे महिलांना वाटत असते.

एकनिष्ठ

कोणतीही स्त्री तिच्या पुरुष जोडीदाराकडून होणारा विश्वासघात सहन करू शकत नाही. सतत खोटे बोलण्यापेक्षा तिला नेहमी सत्य सांगा. तिच्याशी प्रामाणिक राहण्याचे वचन पाळा.

एकाच महिलेशी एकनिष्ठ राहा. एका वेळी अनेक महिलांसोबत संबंध ठेवणे सर्वांसाठीच त्रासदायक ठरू शकते.

वेळ घालवणे

जेव्हा तुमची महिला जोडीदार तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासोबत असते, तेव्हा तुम्ही तिच्यासोबत अधिकाधिक वेळ घालवावा अशी तिची इच्छा असते. त्यावेळी तिला फक्त तुमचे लक्ष हवे असते.

तुम्ही तिच्यासोबत चित्रपट पाहायला जाऊ शकता किंवा लंच आणि डिनरला जाऊन तिच्यासोबत वेळ घालवू शकता.

विशेष महत्त्व देणे

पुरुषांनी स्त्रियांशी विश्वासू मित्रांसारखे वागले पाहिजे. ती तुमची प्रशंसा करू शकते, परंतु नेहमीच असे असणे आवश्यक नाही.

जर ती तुमची मैत्रीण असेल तर तिला विशेष वाटणे तुमचे कर्तव्य आहे. ती तुमच्या आयुष्यातील एक खास व्यक्ती आहे. तुमची महिला जोडीदार जे काही सांगते ते तुम्ही ऐकले पाहिजे.

आपल्या मनातले बोलणे नेहमीच योग्य नसते. पुरुषांनी त्यांच्या बोलण्याकडे तितकेच लक्ष द्यावे अशी महिलांची इच्छा असते.