तुमचा मुलगा 'गे' आहे का? लैंगिकतेबद्दल कळल्यानंतर कसं रिअ‍ॅक्ट कराल

जगात LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो
LGBTQ
LGBTQsakal

LGBTQ समुदायासाठी जून महिना हा खूप खास आहे. हा महिना प्राइड मंथ म्हणून साजरा करतात. 1969 मध्ये LGBTQ समुदायाच्या लोकांनी त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराविरोधात आवाज उठवला होता. तेव्हापासून जगात LGBTQ समुदायाच्या हक्कांसाठी आणि त्यांना समाजात योग्य स्थान मिळावे यासाठी प्राइड मंथ म्हणून साजरा केला जातो. (when your kid comes out as a LGBTQ+, how should you react follow these steps)

भारतात पहिली प्राइड परेड 2 जुलै 1999 रोजी कोलकत्ता येथे आयोजित करण्यात आली होती. त्या परेडला जवळपास 22 वर्षे झाली आहेत आणि तेव्हापासून ती देशातील अनेक राज्यांमध्ये शहरांमध्ये आयोजित केली जाते.

LGBTQ
झूम : मोटारसायकलचाही दिवस असतो खास!

नुकत्याच एका संशोधनात समोर आले की तरुण वयात LGBTQ समुदायाची संख्या मागील काही पिढ्यांपेक्षा जास्त संख्येने बाहेर पडत आहेत २०१३ च्या एका रिसर्च स्टडीनुसार LGBTQ समुदयातील २० वर्षीय वयोगटातील तरूणांनी स्वत:ची ओळख समोर आणण्याचे प्रमाण अधिक आहे.

जर तुम्हाला तुमचा मुलगा LGBTQ आहे, हे कळते तेव्हा काय करावे,असा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा प्रश्न उद्भवणेच चुकीचे आहे. प्रत्येक जन्माला येणारे बाळ वेगळे असते आणि त्यात काहीही योग्य किंवा अयोग्य नाही.

LGBTQ समुदाय हा काही वेगळा नाही. सर्वात आधी त्याकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलायला हवा. जर तुम्हाला तुमच्या मुलांच्या लैंगिकतेबद्दल कळल्यानंतर खालील बाबींच्या आधारे गोष्टी फॉलो कराव्यात ज्यामुळे तुम्हाला त्यांना समजून घेण्यास अधिक मदत होणार.

LGBTQ
वाघांसोबत कुत्र्याला वावरताना पाहिलंय का कधी ?

पहिली प्रतिक्रिया

मुळात आपल्या मुलांसोबत आपले सलोख्याचे किंवा मित्रत्वाचे नाते असावेत तरच मुलगा किंवा मुलगी तुम्हाला ते LGBTQ आहे हे तुमच्यासोबत बिनधास्तपणे शे्अर करणार. जेव्हा तुम्हाला तुमचा मुलगा किंवा मुलगी LGBTQ आहे, हे कळते तेव्हा त्यांच्यासोबत मनमोकळा संवाद साधा. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा.

LGBTQ
कधी साजरा केला जातो International Yoga day ? जाणून घ्या इतिहास

ही एक फेज आहे,असे त्यांना कधीही सांगू नका

मुलांना ही एक फेज आहे, असे कधीही सांगू नका. असे सांगितल्यावर तुम्ही त्यांच्या भावनांना गृहीत धरता.त्यांची ओळख तुम्ही स्वीकारली नाही, ही भावना त्यांच्या मनात तयार होणार आणि आपण उगाच आपल्या पालकांना सांगितलं अशी भावना त्यांच्या मनात तयार होईल. त्यानंतर मुलं तुमच्यापासून अनेक गोष्टी लपवतील आणि तुमच्यासोबत काहीही शेअर करणार नाही.

धर्म किंवा समाज काय म्हणेल,अशी भीती त्यांना कधीही दाखवू नका.

तुमचे कुटुंब धार्मिक असल्यास धर्म किंवा समाज आपल्याला स्वीकारेल का, यामुळे मुलांच्या मनात आधीच भीती असते. पण मुळात आपली लैंगिक ओळख आपल्या धर्मापासून वेगळी आहे हे त्यांना तुम्ही समजून सांगा.धर्म काय म्हणतील, लोक काय म्हणतील किंवा देव काय करतील याचा विचार करू नका. मुलांच्या मनातील ही भीती दुर करा.

LGBTQ
कालच्या शिल्लक भातापासून तयार करा हॉटेलसारखा फ्राइड राइस

तुमच्या मुलांचे मित्र होण्यासाठी स्वतःला शिक्षित करा

जेव्हा तुमचा LGBTQ मुलगा किंवा मुलगी बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न, शंका आणि भीती असणे पूर्णपणे स्वाभाविक आहे. तुमच्यासाठी देखील ही एक वेगळी भावना असते.अशावेळी तुमच्या मुलांना त्याच्या ओळखसोबत स्वीकारणे, गरजेचे आहे. त्यांना समर्थन दिल्याने त्यांच्यासोबत तुम्हालाही आधार वाटेल. तुम्हाला याबद्दल फारशी माहिती नसेल तर मुलाशी बोला, इंटरनेटवर इतर पालकांचा सपोर्ट ग्रुप शोधा. तुमच्या मुलाला समजून घेण्यासाठी प्रयत्न करा. हे प्रयत्न तुम्हाला त्यांच्या जवळ आणेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com