पांढऱ्या केसांना मेहंदी,कलर करताय; बेसिक स्टेप्स माहित आहेत का?

कोणत्या केसांना साधी मेंदी फायदेशीर ठरते
white hair
white hairEsakal

आरशात समोर पांढरा केस दिसला की थोडं टेन्शन यायला सुरू होतं. बापरे आपली सुंदरता कमी होते काय असा थोडा मनात विचार येतो. अशावेळी मग घरगुती काय उपाय करता येतात का? याची शोधाशोध होते आणि बरेच प्रयोग केले जातात. व्हिडीओज ,आर्टिकल याचा आधार घेऊन पांढरे केस काळे किंवा कलर कोटेशन मध्ये कसे करता येईल हे शोधण्यास सुरुवात होते. मात्र यामुळे साईड इफेक्ट, केस गळती, इन्फेक्शन वाढण्यास सुरुवात होते. अशावेळी नेमकं काय करावं हे सुचत नाही. घाबरू नका आज आम्ही तुम्हाला याविषयी माहिती देणार आहोत. कराडच्या ब्युटीशियन संयोगिता, इचलकरंजीच्या स्वाती खवरे यांच्याशी संपर्क साधला आणि माहिती जाणून घेतली. पांढर्‍या केसाच्या या समस्या संदर्भात नेमकी कोणती माहिती पुढे आली हे जाणून घेऊया.

Summary

अनेक महिला घरी मेहंदीचा वापर करतात. यासाठी रात्रभर मेहंदी भिजवतात. त्यात लिंबाचा वापर केला जातो. मेहंदी लावत असताना महिला ती रात्रभर केसांना लावून ठेवतात. आणि कडक झाल्यानंतर मग वॉश करतात.

मेहंदी कधी लावावी

अनेक महिला घरी मेहंदीचा वापर करतात. यासाठी रात्रभर मेहंदी भिजवतात. त्यात लिंबाचा वापर केला जातो. मेहंदी लावत असताना महिला ती रात्रभर केसांना लावून ठेवतात. आणि कडक झाल्यानंतर मग वॉश करतात. खरंतर साधी मेहंदी ही इतका वेळ केसांना लावल्यामुळे केस डॅमेज होतात, शिवाय केस तुटतात. केसांना कोटिंग रहावे, केस कंडिशनमध्ये रहावेत शिवाय पांढरे झालेले केस काळे किंवा कलर मध्ये रहावेत यासाठी केलेला हा प्रयोग पूर्णपणे अयशस्वी होतो.

white hair
नात्यात तुम्ही second choice आहात की, ती फक्त भावना, कसे ओळखाल?

कोणत्या केसांना साधी मेंदी फायदेशीर ठरते

कोणत्याही मेहंदीचा वापर करत असताना पहिल्यांदा आपल्या केसां विषयी माहिती असणे गरजेचे आहे. जसे की केस कोरडे आहेत, केस तेलकट आहेत. केस वॉश केल्यानंतर किती दिवसानी केसांना तेल सुटतं याचा प्राथमिक अभ्यास करणे गरजेचे आहे. सर्वसाधारण मेहंदीचा जास्त फायदा हा तेलकट केसांना होतो. मेहंदी केसांमधील तेल शोषून घेतेच शिवाय मुलायम बनवून कंडिशन करते. मात्र जर ड्राय केसांवरती ही मेंदी लावली तर केस आणखीन ड्राय होतात आणि तुटू लागतात परिणामतः केस गळतीला सुरुवात होते.

केसांना कलर करावा की नको

पांढऱ्या केसांना लपवण्यासाठी कलरचा वापर केला जातो. अनेक तरुणी केसांना वेगवेगळे कलर, हायलाइट्स करतात. कलरमुळे केस सुंदर दिसतात. पण योग्य पद्धतीने जर कलर नाही केला तर याचे परिणामही तेवढेच असतात. आज मार्केटमध्ये कमी पैशात मिळणारे अनेक कलर आपल्याला मिळतात. बजेटमध्ये केसांना कलर करता येतो आणि सुंदर दिसता येतं म्हणून अनेक तरुण याकडे वळतात. काही कालांतराने मात्र यामुळे केस डॅमेज होतात आणि केस गळतीला सुरुवात होते. यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊन केसांना कलर करणे गरजेचे आहे.

कलर लावताना कोणती काळजी घ्यावी

केसांना कलर करत असताना मुळापासून लावू नयेत. त्यांना कलर हा फक्त कोटिंग साठी द्यायचा असतो. यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घेऊनच केसांना कलर करावा. मुळापासून जर केसांना कलर केला तर त्याचा ग्रोथवर परिणाम होऊ शकतो. परिणामी स्किन इन्फेक्शनचा सामनाही करावा लागतो. यासाठी तज्ञांचा सल्ला घेऊनच केसांना कलर करावा.

कलर करायची इच्छा आहे

तुम्ही जर मुळातच केसांना सतत मेहंदी लावत असाल, तर केसांना कलरचा कोट बसत नाही. तुम्हाला योग्य ती हेअर ट्रीटमेंट घ्यावी लागेल. केसांना तज्ञांच्या सल्याने कलर करावा लागेल.

हर्बल प्रोडक्टचा उपयोग होतो का

बाजारात येणाऱ्या प्रत्येक प्रॉडक्टला आपण हर्बल प्रोडक्ट म्हणून वापर करतो. मात्र कोणतेही प्रॉडक्ट हरबल असतेच असे नाही. यात स्ट्रॉंग अमोनिया, हायड्रोजन पेरॉक्साइड चा वापर केलेला असतो. यामध्ये कलर कंटेनरचा वापर केलेला असतो. हरबल म्हणून प्रोडक्टचा वापर करतो मात्र ते हरबल नसतात. कोणतेही प्रॉडक्ट वापरत असताना तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

पांढरे केस काळे होतात का

पांढरे केस काळे होतात का या प्रश्नाचे उत्तर मुळात नाही असंच आहे. पांढऱ्या केसांना कलर कोटेशन केलं तरी ते तात्पुरत्या स्वरूपात राहतात. केस कटिंग झाल्यानंतर काही दिवसांनी केसांची हेयर ग्रोथ होत असते. यामुळे कलर टिकण्याची क्षमता जेवढी आहे तेवढाच कलर टिकतो. पुन्हा पुन्हा केसांना कलर, टचअप हा करावाच लागतो. एक तर तुम्ही केस पांढरे ठेवा किंवा सतत कलर करत राहा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com