esakal | Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन

बोलून बातमी शोधा

Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन
Coronavirus : मीठ, साखरेवर ठेवा नियंत्रण; फॉलो करा असा डाएट प्लॅन
sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

गेल्या वर्षभरापासून सुरु असलेलं कोरोनाचं सत्र अद्यापही कमी झालेलं नाही. सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट आली असून प्रत्येक जण पुन्हा एकदा हवालदिल झाला आहे. त्यामुळे या काळात स्वत:ची आणि कुटुंबियांची जास्तीत जास्त काळजी घेणं हा एकच पर्याय सध्या डोळ्यासमोर आहे. त्यातच कोरोनावर जर मात करायची असेल तर रोगप्रतिकारक शक्ती चांगली असणं अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या दैनंदिन आहारात थोडासा बदल करत सकस आणि पौष्टिक पदार्थ खाण्यावर भर दिला पाहिजे. यामध्येच WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना काळात आपल्या डाएटमध्ये कोणत्या पदार्थांचा समावेश करावा व कोणत्या पदार्थांना दूर ठेवावं याविषयी काही मार्गदर्शक तत्वे सांगितली आहेत. ते पाहुयात.

कोरोना काळात कसा असावा डाएट प्लॅन

सध्यस्थिती पाहता आपल्या आहारात सकस, पौष्टिक आणि ताज्या पदार्थांचा जास्तीत जास्त समावेश करायला हवा. तसंच पाकिटात बंद असलेले, अर्धवट शिजवलेले व उघड्यावरील पदार्थ खाणं सक्तीने टाळा. ज्या पदार्थांमधून व्हिटामिन, मिनरल्स, फायबर, प्रोटिन आणि अॅटी ऑक्सिडेंट मिळतील असे पदार्थ आवर्जुन खा.

हेही वाचा: मुलगी झाली हो! फुलांच्या पायघड्या, ढोल ताशांच्या गजरात बापाने केला जल्लोष

आहारात करा 'हे' बदल

दररोज दोन फळं, हिरव्या पालेभाज्या, १८० ग्रॅम धान्य,१६० ग्रॅम मांसाहार या पदार्थांचा जेवणात समावेश केला पाहिजे. तसंच आठवड्यातून २ वेळा मटण व ३ वेळा चिकन खाता येऊ शकतं. विशेष म्हणजे मीठ आणि साखरेचं प्रमाण कायम नियंत्रणात हवं.

मीठाचं प्रमाण -

WHO नुसार, आपल्या आहारात केवळ ५ ग्रॅम मीठाचाच समावेश असला पाहिजे. परंतु, कोरोना काळात अनेक जण फ्रोजन पदार्थ खाण्यावर भर देत आहेत. या पदार्थांमध्ये मीठाचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे असे पदार्थ खरेदी करतांना कायम त्यात मीठाचं प्रमाण किती आहे ते तपासून पाहा.

साखरेचं प्रमाण -

दररोज आपल्या आहारात केवळ ६ चमचे साखरेचाच समावेश केला पाहिजे. जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा असेल तर साखरेऐवजी गुळ किंवा रसदार फळांचं सेवन करा.

फॅट असलेले पदार्थ दूर ठेवा -

दिवसातून केवळ ३० टक्के फॅट असलेले पदार्थंच खाल्ले पाहिजेत. यात १० टक्के सॅच्युरेडेट फॅट असलं पाहिजे. त्यामुळे वजन वाढवणारे फास्टफूड या दिवसांमध्ये दूर ठेवा.