
How to manage PCOS naturally at home: महिलांशी संबंधित पीसीओएस आणि पीसीओडी आजारांची नावे वाचली असतील किंवा ऐकली असतील. गेल्या काही वर्षांत भारतात पीसीओएस आणि पीसीओडीच्या समस्या वाढतांना दिसत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमवरील अहवालानुसार, PCOS ही महिलांमध्ये एक सामान्य आरोग्य समस्या बनली आहे आणि जगभरात अंदाजे 116 दशलक्ष महिला PCOS मुळे ग्रस्त आहेत.
आकडेवारीनुसार, भारतातील प्रजनन वयाच्या 20 टक्क्यांहून अधिक महिला पीसीओएसने ग्रस्त आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, टक्क्यांहून अधिक प्रकरणांमध्ये, महिलांना पीसीओएसचे निदानही करता येत नाही.
तसेच भारतातील बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींनीही पीसीओएस आणि पीसीओडी आजाराशी असलेल्या त्यांच्या संघर्षाबद्दल सांगितले. सारा अली खान, सोनम कपूर आणि श्रुती हसन सारख्या अभिनेत्रींनीही वेळोवेळी त्यांच्या पीसीओएस आजाराबद्दल उघडपणे बोलले आहे. पण हा आजार का वाढत आहे आणि यावर उपाय काय हे जाणून घेऊया.