
International Mountain Day 2024: दरवर्षी जगभरात ११ डिसेंबरला आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. मानवी जीवनात पर्वतांचे महत्व आणि त्यांची महत्वपूर्ण भूमिका अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्वत दिन साजरा केला जातो. पर्वतांचे संवर्धन आणि पर्वतीय भागात राहणाऱ्या लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.
पर्वत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या जवळपास एक चतुर्थांश भागात व्यापलेले आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात असलेल्या वन्य प्राण्यांसाठी आणि कित्येक लोकांसाठी एक घर आहेत. पर्वतांमुळे हवामान नियंत्रित राहण्यासाठीही मदत होते. चला तर मग जाणून घेऊया या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास...