
पुरुषांनी येथे अचानक नसबंदी करण्यासाठी का केली गर्दी?
अमेरिकेतील गर्भपात कायदा रद्द करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशात नसबंदी करू इच्छिणाऱ्या पुरुषांची संख्या आपोआप झपाट्याने वाढत आहे.
पुरुष नसबंदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस का वाढत आहे हे जाणून घेण्यासाठी दवाखाने आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणांहूनही माहिती गोळा केली जात आहे. ओहायोमधील क्लीव्हलँड क्लिनिकमध्ये गुरुवारी अशी नोंद झाली की पुरुष नसबंदीच्या केसेस या झपाट्याने वाढल्या आहेत.
क्लीव्हलँड क्लिनिक मधील एका डॉक्टरांनी सांगितले की, पुरुष नसबंदीसाठी दिवसातून चार केसेस येत होत्या, परंतु गेल्या शुक्रवारपासुन ते बुधवारपर्यंत पुरुष नसबंदीच्या एकुन ९० केसेस आल्या आहेत.
क्लीव्हलँड, ओहयोच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्सचे म्हणणे आहे की गर्भपातावर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर लोक पुरुष नसबंदी करण्याचा विचार करत आहेत.
डॉ. डेव्हिड रॉबिन्स, नॉर्थ मियामी, फ्लोरिडा येथील यूरोलॉजिस्ट म्हणतात की, आम्हाला पुरुष नसबंदीबद्दल सविस्तर माहिती विचारण्यासाठी सतत फोन येत आहेत.
त्याचवेळी कॅन्सस शहरातील यूरोलॉजिस्ट डॉ. ख्रिश्चन हेटिंगर सांगतात की, आमच्याही दवाखान्यात नसबंदीबाबत माहिती घेण्यासाठी सारखे फोन येत असतात. यावरून असच दिसतं की लोकांना आता पुरुष नसबंदीच्या प्रक्रियेबद्दल जाणून घ्यायचे आहे.
हेटिंगर सांगतात, शुक्रवारपासून पुरुष नसबंदी शोधणाऱ्यांची संख्या ९०० टक्क्यांनी वाढली आहे. कारण ओहयो, टेक्सास, फ्लोरिडा आणि मिसूरी या राज्यात गर्भपाताबाबत कठोर नियम आहेत.
जेराल्ड स्टेडमन यानी वयाच्या ४६ वर्षी पुरुष नसबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ते म्हणतात की, 'जो विरुद्ध वेड' केस ने पुरुष नसबंदी करण्याच्या निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
पुढे तो म्हणाला की माझे लग्न झाले आहे. आम्हालाही मुलं झालेली आहेत. आणि आता आम्हाला मुल होऊ दयायची नाही. मला नाही वाटतं की आता माझ्या बायकोने गर्भवती राहावे. गरोदरपणात महिलांना इतकीच जबाबदारी पुरुषांवर देखील असायला हवी.
ते पुढे म्हणाले, मी काही काळ यावर विचार करत होतो आणि तेवढ्यात सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. तेव्हा मीसुध्दा नसबंदी करण्याचा ठाम निर्णय घेतला.
अशीच आणखी एक व्यक्ती म्हणजे पॉल राहफिल्ड, जो न्यू ऑर्लिन्सचा रहिवासी आहेत. त्याच कारणांसाठी त्यांनी नसबंदी करण्याचा निर्णयही घेतला आहे. ते सांगतात की, न्यायालयाच्या निर्णयानंतर मी पुरुष नसबंदी करून घ्यायचे ठरवले आणि मी युरोलॉजिस्टशी बोलणं सुरू केलं आहे.
ते पुढे म्हणतात की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर माझ्या पत्नीच्या जिवाला धोका असल्याचे मला वाटतं आहे.
ते नंतर म्हणाले की, न्यायालयाने हा निर्णय रद्द केला नसता तर मला अशी नसबंदीसाठी धाव घ्यावी लागली नसती. आम्हाला मुले नको आहेत. माझी पत्नीच माझे जीवन आहे. या कायद्यांमुळे माझ्या पत्नीचा जिव धोक्यात आला आहे.
त्याच वेळी लॉस एंजेलिसमधील सेंटर फॉर मेल रिप्रोडक्टिव्ह मेडिसिन अँड व्हॅसेक्टोमी रिव्हर्सलचे संचालक डॉ. फिलिप वर्थमन पुरुषांनो नसबंदी करण्यासाठी अति घाई करु नका असा सल्ला देत आहे.
डॉ. फिलिप वर्थमन यांचे मत आहे की पुरुष नसबंदी निर्णय घाईघाईने घेणे टाळावा, कारण पुरुष नसबंदीचा परिणाम तुमच्या आरोग्यावरही होऊ शकतो.
पुढे ते म्हणाले की "मला खूप आनंद आहे की पुरुष त्यांच्या आरोग्याची आणि पुनरुत्पादक निवडीची जबाबदारी घेत आहेत पण तुम्हाला कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया करायची असेल तर आधी तुम्ही त्या शस्रक्रियाविषयी सगळी सविस्तर माहिती घेऊनच मग शस्रक्रिया करावी."
Web Title: Why Did Men Rush Here For Sudden
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..