वेशभूषा : प्रभाव अधोरेखित करा!

कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपली छाप पाडण्यासाठी कोणत्या प्रकारची वेशभूषा करावी, याचा विचार आपण करणार आहोत.
why dressing like a professional still matters
why dressing like a professional still matterssakal
Updated on

काही लोक एखाद्या रूममध्ये आल्यानंतर लगेच त्या रूमचा जणू काही ताबा घेतात. एखादा मुद्दा मांडायची इच्छा असल्यास त्यांना लगेच संधी मिळते. असे का होत असावे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये आपली छाप पाडण्यासाठी कोणत्या प्रकारची वेशभूषा करावी, याचा विचार आपण करणार आहोत.

स्वत:कडे गांभीर्याने पाहा

स्वत:च्या बाबतीत गंभीर नसल्यास अन्य कुणीच तुमच्याकडे गांभीर्याने पाहणार नाही. आपण परिधान केलेल्या कपड्यांचा काही विशेष प्रभाव पडत नाही, असे आपल्याला अनेकदा जाणवते. ‘‘कपड्यामुळं काय फरक पडतो? माझं कामच बोलतं सर्व काही,’’ अशा स्वरूपाची वाक्ये आपण अनेकदा ऐकतो.

हे एका अर्थाने खरे असले, तरी एखादे प्रेझेंटेशन देताना किंवा क्लाएंट मिटिंगसाठी जाताना नीटनेटका पोशाख करून गेल्यास त्याला अस्थानी म्हणता येणार नाही. अत्यंत प्रभावी वेशभूषा असलेली व्यक्ती एखादे विधान करते, तेव्हा समोरच्या व्यक्तीपर्यंत ते अधिक परिणामकारकपणे पोहोचते. आपली वेशभूषा आपल्या कामाप्रती असलेल्या समर्पणाचे प्रतीक असते.

कोणासमोर जाणार आहोत?

तुमची वेशभूषा तुमच्याविषयीचा संवाद असतो. आपण कुणाला भेटणार आहोत आणि त्यांच्याशी कशाविषयी संवाद साधणार आहोत याचा विचार करून वेशभूषा ठरवावी. भेटणाऱ्या लोकांचा अभ्यास करा.

एखाद्या ग्राहक कंपनीच्या सीईओकडे जाताना टी-शर्ट परिधान करून गेलात आणि समोरची व्यक्ती फॉर्मल कपड्यांमध्ये असल्या त्या व्यक्तीला हे विचित्र वाटू शकते. एखाद्या व्यक्तीने आपली उद्दिष्टे साध्य करण्याकरिता आपल्याशी मोकळेपणाने आणि जवळीकीने बोलावे यासाठी वेशभूषा ही पहिली पायरी असते.

why dressing like a professional still matters
Dress Code: राज्यातील तब्बल ११४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू; महाराष्ट्र मंदिर महासंघाची माहिती

कार्यसंस्कृतीशी जोडलेले राहा

तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ओळखता आणि त्यांच्या अडचणी सोडवण्यामध्ये तुम्हाला काहीच समस्या नाही हे प्रदर्शित करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे वेशभूषा. समजा तुम्ही आपल्या कार्यपद्धतींविषयी आग्रही असलेल्या एखाद्या क्लाएंटबरोबर मिटिंग करत आहात, अशावेळी तुमची फॉर्मल वेशभूषाही त्याला तुम्ही सर्व प्रक्रियांचे व्यवस्थित पालन कराल याविषयी एक प्रकारची खात्री देत असते.

‘मेटा’ ही युवा पिढीसाठी उत्पादने तयार करणारी ‘कूल’ कंपनी आहे, हे सांगण्यासाठी मार्कझुकरबर्ग नेहमी टी-शर्ट आणि जीन्स परिधान करतो. ‘इनफॉर्मल ड्रेसिंग’ ही सुद्धा एक प्रकारची वेषभूषा आहे.

why dressing like a professional still matters
Bodycon Dresses : सध्याचा ट्रेंड असणारे बॉडीकॉन ड्रेसेस ट्राय करायचेत? क्रिती, साराकडून घ्या आयडिया

कोणती वेशभूषा करावी?

वेशभूषा ही एखाद्या वस्तूच्या वेष्टनाप्रमाणे असते. बाहेरील वेष्टन आणि आतील वस्तू यामध्ये कधी विसंगती असता कामा नये. हेच आपल्या व्यक्तिमत्वालाही लागू आहे. कुठले तरी वेगळेच कपडे घालून त्यामध्ये अवघडलेपणाने वावरण्याऐवजी तुमच्या व्यक्तिमत्त्वाला साजेशी वेशभूषा करणे हे कधीही श्रेयस्करच ठरते.

स्वत:ला आरशात पाहा. तुम्ही इतरांना कसे दिसता आणि तुम्हाला कोणती वेशभूषा शोभून दिसते किंवा दिसतनाही याचा विचार करा. आपल्या करिअरच्या प्रगतीसाठी कोणती वेशभूषा फायदेशीर ठरेल याचा विचार करून ती वेशभूषा परिधान करण्याचा सराव करा.

why dressing like a professional still matters
Self-Discipline : या 6 गोष्टींची शिस्त स्वतःला लावून घ्या, Success तुमची पाठ कधीच सोडणार नाही

केवळ वरच्या वेष्टनामुळे एखादी वस्तू लोकप्रिय होत नाही, त्याचप्रमाणे फक्त वरवरच्या वेशभूषेमुळे तुम्ही करिअरमध्ये फार मोठी प्रगती करू शकत नाही. स्वत:ला घडवल्यानंतर दिसून येणाऱ्या परिणामांना अधिक प्रभावीपणे अधोरेखित करण्यासाठी वेशभूषा हे एक ‘समांतरक्षेत्र’ आहे. यशाची परिणामकारकता वाढवण्याचा हा महत्त्वाचा मार्ग आहे. तुम्ही सध्या ज्या भूमिकेत आहात त्यानुसार, अन्यथा तुम्हाला जी भूमिका निभावण्याची इच्छा आहे त्यानुसार वेशभूषा करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.