

World Earth Day 2026 History, Significance and Theme
sakal
World Earth Day 2026 History, Significance, Theme: दरवर्षी २२ एप्रिल आला की “पृथ्वी दिन” साजरा केला जातो. पण हा दिवस नेमका याच दिवशीच का ठरला, हे तुम्हाला माहिती आहे का? वाढतं प्रदूषण, बदलतं हवामान आणि निसर्गावर वाढणारा ताण पाहता, आजच्या काळात या दिवसाचं महत्त्व पूर्वीपेक्षा कितीतरी पटीने वाढलं आहे. पृथ्वीला वाचवण्याची जबाबदारी केवळ सरकारची नाही, तर आपल्यापैकी प्रत्येकाची आहे. म्हणूनच, चला जाणून घेऊया पृथ्वी दिनाचा इतिहास, 2026 ची थीम आणि आपल्या रोजच्या आयुष्यात सहजपणे वापरता आणता येतील असे काही सोपे इको-फ्रेंडली उपाय.
अर्थ डे ला आंतरराष्ट्रीय मदर अर्थ डे असेही संबोधले जाते. या दिवशी लोकांमध्ये पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे महत्त्व आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित व शाश्वत पृथ्वी घडवण्याबाबत जनजागृती केली जाते.