Benefits Of Evening Exercise: संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Benefits Of Evening Exercise : संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का?

Benefits Of Evening Exercise : संध्याकाळी व्यायाम करण्याचे फायदे माहितीये का?

Benefits Of Evening Exercise: सकाळच्या वेळी व्यायाम (Exercise) करण्याचे फायदे आपल्याला माहित आहे. पण संध्याकाळी व्यायाम, योगा(yoga) करण्याचे काही फायदे आहे. सकाळी केले जाणऱ्या एक्सरसाईजमध्ये आपले शरीर आणि मेंदू (Body and Brain)योग्य काम करते. तेच रात्रीच्या वेळी केल्या जाणाऱ्या व्यायामामुळे आपल्याला मानिसक शांती मिळते आणि रात्री छान झोप मिळते.

संध्याकाळी व्यायाम, योगा सारख्या अॅक्टिव्हिटी केल्यामुळे एक फायदा हा देखील असतो ती तुम्हाला सकाळी धावपळीत व्यायाम करण्यासाठी वेळ काढावा लागत नाही. संध्याकाळी व्यायाम करण्याचे आणखी फायदे देखील आहे. (Benefits Of Evening Exercise)

हेही वाचा: हिवाळ्यात हात-पाय थंड पडतात? जाणून घ्या कारण अन् उपाय

ताण कमी होतो

संध्याकाळच्या वेळी केलेल्या व्यायाम किंवा योगामुळे आपला दिवसभरातील ताण आणि निराशा कमी होते. त्यामुळे एक अगदी छान फ्रेश झाल्यासारखे वाटते. त्यामुळे तुम्हाला छान झोप येते.

सकाळच्या वेळी टाईम मॅनेजमेंट

सकाळी कामाच्यावेळी आपल्यान कोणत्या ना कोणत्या कामासाठी वेळेत निघायचे असतो त्यामुळे आपल्याकडे खूप कमी वेळ असतो. अशावेळी तुम्ही सकाळीच व्यायाम करण्याचे ठरवले तरी ते रोज करणे अवघड असते. पण संध्याकाळी वेळेचा तशी अडचण होत नाही. त्यामुळे अधिक निवांतरपणे, आरामात योगा, व्यायाम देखील करू शकता.

हेही वाचा: Solo Travel करताय? महिलांनी 'अशी' करावी बॅग पॅक

राग किंवा निराशा बाहेर काढण्याचा उत्तम उपाय

रात्रीच्या वेळी व्यायाम केल्यामुळे फक्त शरीर फिट राहात नाही तर तुमचे मनातील चिंता देखील दूर होते. दिवसाभरामध्ये काही त्रासदायक घटना घडलेली घटना मनात असेल तर काही वेळ व्यायाम केल्यास सर्वा काही मनातून निघून जाईल. इतकेच नव्हे तुमचे हार्मोन्स असंतुलन देखील कमी करण्यासाठी संध्याकाळी केलेला व्यायामा महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो.

त्याशिवाय संध्याकाळी शरीरमध्ये तितके आखडलेले नसते जितके सकाळी झोपेतून उठल्यावर असते. त्यामुळे संध्याकाळी एक्सरसाईज करण्याची सवयीचा एक महत्त्वाचा फायदा आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी होते.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :exercisechild health
loading image
go to top