esakal | महिलांच्या शर्टला पुरुषांसारखे खिसे का नसतात?
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या शर्टला पुरुषांसारखे खिसे का नसतात?

महिलांच्या कपड्यांमध्ये पुरुषांच्या कपड्यांइतकेच खोल आणि उपयुक्त खिसे (पॉकेट्स) का नाहीत? हा फरक 400 वर्षांपासून सुरु आहे.

महिलांच्या शर्टला पुरुषांसारखे खिसे का नसतात?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

पुणे: लहानापासून ते मोठ्यापर्यंत अनेकांना जीन्स (Jeans) वापरायला आवडते. त्यामुऴे जिन्सचा ट्रेंड (Trends) आजही जोमात आहे. परंतु त्यात पुरुषांच्या जीन्सला खिसे (Pockets) असतात पण महिलांच्या जीन्सला खिसा नसतो? चला तर मग त्याच्यामागील कारण जाणून घेऊयात.

हेही वाचा: हेल्दी फूड : वेगनिझम : ट्रेंड की लाईफस्टाईल?

पहिले कारण असे आहे की, स्त्रिया आणि पुरुष यांच्या शरीर रचनांमध्ये फरक असतो. खरं तर पुरुष बहुधा कागदपत्रे आणि पेन समोरच्या खिशात ठेवतात त्यामुऴे त्यांचे खिसे मोठे होतात. अशा परिस्थितीत, जर स्त्रियांची अशीच स्थिती असेल तर अचानक लोकांचे लक्ष त्यांच्या स्तनांकडे जाऊ शकते. हे घडू नये, परंतु स्त्रियांच्या शर्टमध्ये खिसे नसणे हे कारण सर्वात महत्त्वाचे मानले जाते. ज्यांच्या शर्टला खिसे आहेत ते देखील केवळ नावासाठी ठेवले आहेत.

दुसरे कारण असे आहे की, महिलांना भरपूर सामान सोबत नेण्याची सवय असते आणि अशा परिस्थितीत समोरचे खिसे पुरेसे नसतात. अशा परिस्थितीत लहान खिसे एकतर महिलांच्या शर्टला दिले जाते किंवा काही वेळेस दिले जात नाही.

हेही वाचा: 2021 च्या फॅशन जगतातला नवा ट्रेंड

तिसरे कारण असे आहे की, व्हिक्टोरियन युगात स्त्रियांना कॉर्सेट घालावे लागत. आणि त्यावेळी महिलांचे कपडे अशा प्रकारे बनवले जायचे की त्या कपड्यांची साईझ योग्य दिसली पाहिजे. त्या दिवसांत, स्त्रिया स्कर्टसह बांधलेल्या पोटलीमध्ये आपले सामान ठेवत असत आणि पुरुषांसाठी पॉकेट वॉच ऐवजी पॉकेट्स बनविल्या जात असत. तेथून पुरुष आणि स्त्रियांच्या खिशाचे फॅशन बदलू लागले.

जर या खिशांच्या इतिहासाबद्दल बोलायचे झाले तर आपल्याला व्हिक्टोरियन युगाकडे परत जावे लागेल. रेशनल ड्रेस सोसायटीची स्थापना 1891 मध्ये कॉर्सेटच्या शेवटी 1800 मध्ये झाली. लंडनमध्ये तयार झालेल्या या सोसायटीने व्हिक्टोरियन युगात ड्रेस रिफॉर्म आणले. त्याच्या निर्मितीनंतर, कॉर्सेट जवळजवळ अदृश्य झाले आणि स्त्रियांसाठी ट्राऊझरसारखे कपडे देखील बनविले गेले, ज्यामध्ये खिसे होते. परंतु त्या काळाच्या विचारानुसार जेव्हा जेव्हा स्त्रिया खिशात वस्तू ठेवत असत, तेव्हा त्यांचा आकार वाईट दिसत होता.

हेही वाचा: प्लस साईज स्त्रियांनी नक्की ट्राय करा 'ही' फॅशन

त्यानंतर 1920 च्या दशकात फॅशन डिझायनर कोको शनेलने पहिल्यांदा महिलांच्या जॅकेटमध्ये खिसे शिवण्यास सुरुवात केली. 1970 च्या दशकात महिलांचे कपडे बरेच आधुनिक झाले होते आणि त्यांच्या सोयीपासून ते त्यांच्या आवश्यकतेपर्यंत सर्व काही विचारात घेत होते, परंतु त्यानंतर फॅशन सुधारणेस सुरुवात झाली आणि महिलांच्या फिगरवर अधिक फोकस केले गेले. 1990 च्या दशकापर्यंतही महिलांच्या पॅन्टमध्ये काही फंक्शनल पॉकेट्स देण्यात आल्या. त्यावेळच्या अभिनेत्रींच्या जीन्सवर नजर टाकल्यास, ती आजच्या फॅशनपेक्षा किती वेगळी आहेत हे तुम्हाला समजेल, पण महिलांच्या फिगरला महत्त्व दिले जाऊ लागताच पँटमधील खिसे (पॉकेट्स) गायब झाले.

loading image