

esakal
तुमच्या फ्रिजमधून येणारा तो भयंकर वास आणि दोनच दिवसांत कोमेजलेली कोथिंबीर, पालक, लेट्यूस याला तुम्ही वैतागला असाल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आता भारतीय घरामध्ये एक नवीन ट्रेंड जोरात पसरतोय फ्रिजच्या भाजीच्या डब्यात किंवा शेल्फवर एक छोटासा पिवळा ओला स्पंज ठेवणे. एवढ्याने काय होतंय असं वाटतंय? पण ही जादू आहे..हा स्पंज फ्रिजमधला ओलावा आणि वास दोन्हींवर नियंत्रण मिळवतो, आणि तुमच्या भाज्या-फळांना आठवडाभर फ्रेश ठेवतो.