International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे
International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे

International Men’s Day 2021: का साजरा करतात पुरूष दिन... जाणून घ्या कारणे

जगभरात 19 नोव्हेंबरला जागतिक पुरूष दिन साजरा केला जातो. पुरुषांनी समाजाला, समुदाय आणि कुटूंबासाठी जे योगदान दिले आहे ते साजरे करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. या दिवशी पुरूषांच्या आरोग्य आणि कल्याणाविषयीही जागरूकता निर्माण केली जाते.

पुरुष दिनाचे सहा स्तंभ -

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन हा सहा स्तंभांवर आधारित आहे. पुरुष सकारात्मकतेने आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. आजच्या जीवनात पुरुष हा समाज, समुदाय, कुटुंब, विवाह, मुलांची काळजी, पर्यावरणासाठी योगदान देण्यासाठी लक्ष देतो. पुरूषांच्या आरोग्याची, त्याच्या सामाजिक, भावनिक, शारिरिक, आध्यात्मिक आरोग्याची काळजी घेण्याचे वचन तिसरा स्तंभ देतो. अनेक क्षेत्रांमध्ये त्यांना भेडसावणाऱ्या भेदभावावरही प्रकाश तो टाकतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिन लैंगिक संबंधांबद्दल जागरूकता निर्माण करतो. लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यावर लक्ष केंद्रित करतो. जेथे प्रत्येक जण पूर्ण क्षमतेने भरभराट करू शकेल, असे सुरक्षित जग निर्माण करण्याचे वचन देतो.

हेही वाचा: World Men's Day : पुरुषांना असतो "या" कामात इंटरेस्ट

ही आहे थीम

यावर्षी IMD 2021 ची थीम स्त्री आणि पुरुषांमधील चांगले संबंध आहे. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रम आणि परिषदा आयोजित केल्या जातात.  जिथे पुरुष आणि मुलाशी संबंधित समस्यांवर चर्चा केली जाते, तसेच जागरूकता निर्माण केली जाते.

इतिहास  

इतिहासाचे प्राध्यापक, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथील वेस्ट इंडीज विद्यापीठातील डॉ. जेरोम टेलुकसिंग यांनी वडिलांच्या जयंतिनिमित्त 1999 साली आंतरराष्ट्रीय पुरुष दिन पहिल्यांदा सुरू केला. या दिवसाचा उपयोग पुरुष आणि मुलांशी संबंधित समस्या मांडण्यासाठी केला जावा, यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते. 

असे आहे महत्व 

हा दिवस पुरुषांचे आरोग्य, कल्याण, त्यांचा लैैगिक संघर्ष, त्यांना भोगाव्या लागणाऱ्या सामाजिक परिस्थितीबाबत बोलण्यासाठी समर्पित केला आहे. आजच्या दिवशी त्यांना भेडसावणाऱ्या भेदभावाबद्दल बोलता येते. तसेच चांगले लैंगिक संबंध निर्माण करण्याचे वचन दिले जाते.मूलभूत मानवतावादी मूल्ये आणि पुरुषांबद्दल जागरूकता वाढवणे हा या दिवसाचा महत्वाचा उद्देश आहे.

हेही वाचा: 'सिंगल फादर्स' मुलाचं संगोपन करताना घ्या 'ही' काळजी

loading image
go to top