
Hindu Nav Varsh 2025: आज देशभरात गुढा पाडवा साजरा केला जात आहे. तसेच आजपासून चैत्र नवरात्री देखील साजरी केली जाते आहे. पण याच दिवशी हिंदूंचे नव वर्ष देखील सुरू होते. पंचांगानुसार या नवीन वर्षाला '२०८२ काल्ययुक्त' संवत्सर असे म्हटले जाईल. या नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे चैत्र नवरात्र तर महाराष्ट्र आणि कोकणातील लोक हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा करतात.
तर आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकातील लोक या दिवशी युगादी सण साजरा करतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की हिंदूंचे नवीन वर्ष चैत्र नवरात्रीपासूनच का सुरू होते? यामागे कोणते कारण आहे हे जाणून घेऊया.