Parenting Tips
Parenting Tipssakal

Parenting Tips: आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे मुलांसाठी उपयुक्त, कसा होतो फायदा जाणून घ्या

आजच्या युगात, खेळ, अभ्यास आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेटमध्ये व्यग्र असल्यामुळे मुलांना आजी-आजोबांसोबत वेळ घालवायला वेळ मिळत नाही.
Published on

व्यस्त वेळापत्रक आणि जीवनशैलीमुळे आजकाल मुलांना आई-वडील आणि आजी-आजोबांसोबत जास्त वेळ घालवता येत नाही. मुले त्यांचा अभ्यास, खेळणे ऍक्टिव्हिटीज आणि गॅझेटमध्ये खूप व्यस्त असतात. पण मुलांसाठी आजी-आजोबांसोबत वेळ घालवणे खूप गरजेचे आहे. मुलं त्यांच्या आयुष्यातील अनुभवातून खूप काही शिकू शकतात.

त्यांची कल्चर व्हॅल्यू जाणून घेतात. या गोष्टीमुळे त्यांचे व्यक्तिमत्वही वाढते. या गोष्टी लाईफमध्ये ग्रो करण्यासाठी उपयुक्त आहेत. मुलांनी आजी-आजोबांसोबत वेळ का घालवायचा याची इतर कारणेही आहेत.

Parenting Tips
Cinnamon Benefit For Hairs: दालचिनी आहे केसांसाठी फायदेशीर, चांगल्या परिणामांसाठी असा करा वापर

संस्कृती

आजी-आजोबांसोबत राहून मुलांना त्यांच्या कुटुंबाची माहिती मिळते. त्यांच्या संस्कृतीबद्दल जाणून घेतात. आजी-आजोबांइतके पालकांनाही या गोष्टीची जाणीव नसते. आजी-आजोबांसोबत राहिल्याने मुलांना सण साजरे करण्याची पद्धत आणि नातेवाइकांची माहिती मिळते.

संस्कार

मुलं आजी-आजोबांकडून संस्कार शिकतात. वडिलधाऱ्यांच्या चरणांना स्पर्श करणे, नमस्कार करणे, देवाची नित्य प्रार्थना करणे. या सगळ्या गोष्टी मुलं आजी-आजोबांकडून शिकतात. मुलांना त्यांच्या मूल्यांचा आणि परंपरांचा पाया समजतो.

कथा

फार कमी मुलं असतील ज्यांनी आजी-आजोबांकडून कथा ऐकल्या नसतील. आजी-आजोबांनी मुलांना सांगितलेल्या कथा आणि कवितांचाही मुलांच्या व्यक्तिमत्त्वावर परिणाम होतो. यातून मुलांना नैतिक शिक्षण मिळते.

Parenting Tips
Cashew Nut Benefits: एका दिवसात किती काजू खाणे योग्य? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

गोष्टी शेअर करतात

काही गोष्टी अशा असतात ज्या मुलांना त्यांच्या पालकांना सांगता येत नाहीत. पण त्या गोष्टी आजी-आजोबांना सांगायला तो कचरत नाही. तुम्ही तुमच्या गोष्टी त्यांच्यासोबत शेअर करू शकता. ही गोष्ट त्यांना कोणत्याही कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते. यामुळे मुले कोणतीही गोष्ट विचारपूर्वक करतात. यामुळे मुले त्यांचे विचार मांडू शकतात आणि तणावाखाली राहत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com