
युद्धग्रस्त सैनिक अन् नागरिकांसाठी रेड क्रॉस ठरतीये देवदूत; जाणून घ्या इतिहास
World Red Cross Day 2022: जागतिक रेड क्रॉस दिवस दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रॉसचे जनक जीन-हेन्री ड्युनंट (Henry Dunant) यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. जीन हेन्री ड्युनंट यांचा जन्म 8 मे 1828 रोजी स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा शहरात झाला. त्यांना 1901 मध्ये जगातील पहिले शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. जीन ड्युनंट यांनी 1863 मध्ये इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस (ICRC) ची स्थापना केली होती. पुढे 1920 मध्ये भारतातही अशीच एक संस्था स्थापन करण्यात आली, तिचे नाव होते 'इंडियन रेड क्रॉस सोसायटी'.
हेही वाचा: Photo Story: यशवंतराव ते उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे 19 भाग्यविधाते मुख्यमंत्री
जागतिक रेडक्रॉस दिनाचा इतिहास (History of World Red Cross Day):
1859 मध्ये सॉल्फेरिनो (इटली) येथे एक भयंकर युद्ध झाले, ज्यामध्ये 40 हजारांहून अधिक सैनिक मरण पावले आणि लाखो जखमी झाले. जखमी सैनिकांची दुर्दशा पाहून हेन्री ड्युनंटला खूप वाईट वाटले. तेव्हा हेन्री ड्युनंटने गावातील काही लोकांसह त्या सैनिकांना मदत केली. यानंतर, 1863 मध्ये, त्यांनी एक समिती स्थापन केली. या समितीला 'इंटरनॅशनल कमिटी ऑफ रेड क्रॉस' (ICRC) असे नाव देण्यात आले. जागतिक रेड क्रॉस दिन पहिल्यांदा 1948 मध्ये साजरा करण्यात आला होता. मात्र, हा दिवस 1984 पासून अधिकृतपणे साजरा केला जात आहे. जागतिक रेडक्रॉस दिनाची यंदाची थीम 'Be Human Kind' ही आहे.
जागतिक रेडक्रॉस दिनाचा उद्देश (Purpose of World Red Cross Day):
जागतिक रेडक्रॉस दिन साजरा करण्याचा मुख्य उद्देश युद्धात जखमी झालेल्या सैनिकांना आणि नागरिकांना मदत करणे हा आहे. कोरोना महामारी असो किंवा रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेले युद्ध असो, रेड क्रॉसने मानवतेच्या रक्षणासाठी नेहमीच तत्परतेने काम केले आहे. या संस्थेशी संबंधित लोकांनी कोरोना महामारीच्या काळात लोकांना मोफत मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझरचे वाटप केले आहे.
हेही वाचा: नाकावरच्या रागाला औषध हाय! Anniversary विसरल्यास असं करा जोडीदाराला खूश
रेड क्रॉस म्हणजे काय? (What is Red Cross):
रेड क्रॉस ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी महामारी, नैसर्गिक आपत्ती, युद्धे आणि आपत्कालीन परिस्थितीत लोकांना कोणताही भेदभाव न करता मदत करते. या संघटनेच्या स्थापनेमागचा उद्देश अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मानवतेची सेवा करणे हा आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धात जखमी झालेल्या लोकांना आणि सैनिकांनाही रेड क्रॉस संस्था मदत करत आहे.
Web Title: Why Is World Red Cross Day Celebrated Learn The Whole History
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..