Toilet Get Fact : मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे खालून आखूड का असतात? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Toilet Get Fact

Toilet Get Fact : मॉलच्या टॉयलेटचे दरवाजे खालून आखूड का असतात?

Why Mall's Toilet Doors Are Short : हल्ली प्रत्येकच लहानमोठ्या शहरांमध्ये टॉयलेट असतात. तिथं जाण्याचा प्रसंग बहुतेकांना आलेला असेल. त्यावेळी इथले दरवाजे आखुड का असतात असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. पण यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का? असं करण्यामागचा उद्देश जाणून घ्या.

संकटकाळी ठरतात उपयुक्त

जर टॉयलेट यूज करताना कोणाची अचानक तब्येत खराब झाली तर त्याला सहज बाहेर काढता यावं. शिवाय मॉलमध्ये लहान मुलंही असतात. जर आत कोणी अडकलं तर बाहेर काढण्याचं टेंशन येत नाही.

स्वच्छता करण्यासाठी सोपं

शॉपिंग मॉल्स, मल्टिप्लेक्समध्ये भरपूर माणसांची वर्दळ असते. दिवसभर टॉयलेटता वापर होत असतो. अशात साफसफाई करायला अडचण होऊ नये म्हणून देखील हे सोयीचं असतं. म्हणजे खालून सहज पुसता येतं.

स्मोकींग करू नये म्हणून

वर्दळीच्या ठिकाणी अनेक तऱ्हेचे लोक असतात. अशात स्मोकींग करणारे बहुतांश वेळा टॉयलेटमध्ये जाऊन स्मोक करण्याची शक्यता असते. पण बंद टॉयलेटमध्ये स्मोकींग करणे हे इतरांसाठीही घातक ठरते. अशा लोकांवर आळा घालण्यासाठी हे आखूड दरवाजे उपयुक्त ठरतात.

रोमिओंवर लगाम

सार्वजनिक ठिकाणी गैरप्रकार घडण्याच्या शक्यता नाकारता येत नाही. काही लोक स्वच्छतागृहांमध्ये अश्लिल चाळे करू लागतात. अशात जर दरवाजे अखूड असतील तर त्यांना प्रायव्हसी मिळत नाही. त्यामुळे असे कोणतेही प्रकार ते करू शकत नाहीत.

टॅग्स :Malltoilets