Selfie Faces : तुम्ही मोबाइलच्या कॅमेऱ्यापेक्षा आरशात का सुंदर दिसतात? जाणून घ्या सत्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Selfie Faces

Selfie Faces : तुम्ही मोबाइलच्या कॅमेऱ्यापेक्षा आरशात का सुंदर दिसतात? जाणून घ्या सत्य

Why We Look Better In Mirror Than Mobile Camera : तुमच्या सोबत असं होतं का, की आरशात बघितलं तर स्कीन ग्लो करते, केस एकदम पर्फेक्ट असते. पण तेच मोबाइल कॅमेरात बघितलं की, काँफीडन्स डाऊन होतो. स्मार्टफोनच्या कॅमेऱ्यात आणि आरशात दिसणाऱ्या चेहऱ्यात एवढा फरक का पडतो? जाणून घेऊया या मागचं कारण.

आरशात आपण जे चित्र पाहतो ते आपल्या डोळ्यांसाठी फॅमेलियर असतं. आरशात बघून आपण ब्रश करतो, केस विंचरतो, मेकअप करतो, बराच वेळ घालवतो. त्याची आपल्याला एवढी सवय झालेली असते की, जेव्हा आपण त्याची रिव्हर्स इमेज बघतो तर आपण अनकंफरटेबल होतो.

आपण एकापेक्षा जास्त फोटो काढतो आणि त्यातला बेस्ट वापरतो. कॅमेरा आपली 2D इमेज दाखवत असल्याने काही फिचर्स गडबड वाटतात.

हेही वाचा: Rear View Mirror : रिक्षातला 'तो' आरसा महिलांसाठी का ठरतोय त्रासदायक ?

आपण रोज जी इमेज आरशात पाहतो त्यालाच रियल मानतो आणि सुंदर समजतो. त्यामुळे कॅमेऱ्यात पाहिल्यावर तुम्हाला तुम्ही कमी फोटोजेनिक वाटतात. फोटो सुंदर येण्यासाठी चेहऱ्याची सिमेट्रीपण आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचा चेहरा सिमेट्रिकल नसेल तर कँडीड फोटोज तुम्हाला आनडत नाहीत.

हेही वाचा: Mirror : लिफ्टचा आरसा लिफ्टमधला वेग कमी करतो? जाणून घ्या सत्य

चांगला प्रकाश, योग्य अँगल आणि परफेक्ट पोजमुळे तुमचे फोटोज चांगले येतात. पण फोनचा फ्लॅशलाइट चेहऱ्यावरच्या त्या गोष्टींनापण हायलाइट करतो जे तुम्हाला आवडत नाहीत. त्यामुळे नॅचरल लाइटमध्ये फोटो काढा.

टॅग्स :mobileselfie