Winter 2022: आरोग्यवर्धक तुळशीचा चहा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tulsi tea

Winter 2022: आरोग्यवर्धक तुळशीचा चहा बनवताना या गोष्टी लक्षात ठेवा...

हिवाळ्यात तुळशीचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे. पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास, तुळसमध्ये आयसोटीन आणि सॉर्बिटॉल, मॅंगनीज सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. पण हा तुळशीचा चहा बनवताना या  काही गोष्टी लक्षात ठेवल्या की चहा अजुनच भन्नाट लागु शकतो.

तुळशीचे धार्मिक महत्त्व तर आहेच, पण तुळशी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. विशेषत: सुरुवातीच्या थंडीत अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होतो. अशा परिस्थितीत तुळशीचा चहा पिणे खूप फायदेशीर आहे.

पोषक तत्वांबद्दल बोलायचे झाल्यास, तुळशीमध्ये आयसोटिन आणि सॉर्बिटॉल, मॅंगनीज, फोलेट इत्यादी असतात, जे तुमची पचनक्रिया सुधारतात. 

जर तुम्हाला थंडीच्या दिवसात तुळशीचा चहा प्यायला तर त्याचे अधिक गुणधर्म मिळवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. चला तर मग आजच्या लेखात जाणून घेऊया त्याविषयीची सविस्तर माहिती..

हेही वाचा: Tulsi Vivah 2022: तुळशी विवाहला करा 'हे' सोपे उपाय; वैवाहिक जिवनात नांदेल आपोआप सुख शांती

1) जर तुम्हाला तुळशीच्या चहाचे पूर्ण फायदे हवे असतील तर तुम्ही चहा करताना कमीत कमी चहापत्ती घालावी, अन्यथा तुळशीचा फारसा परिणाम होणार नाही. त्याऐवजी 7 ते 8 तुळशीची पाने टाकावीत.

2) तुळशीच्या चहाचे फायदे वाढवायचे असतील तर साखरेऐवजी गुळाचा वापर करा. थंडीच्या दिवसात गुळाचा चहा खूप फायदेशीर आहे.

हेही वाचा: Tulsi Vivah 2022: तुळशीचं लग्न शाळीग्राम दगडासोबत का लावलं जातं ?

3) जर तुम्हाला खोकला, सर्दी किंवा घशाचा त्रास जास्त असेल तर तुम्ही तुळशीच्या चहामध्ये दोन काळ्या मिर्‍या बारीक करून टाकू शकता. यामुळे त्याची चवही वाढेल आणि बंद झालेल्या नाकालाही आराम मिळेल.

4) बरेच लोक तुळशीचा चहा बनवताना ते चांगले बारीक करतात. पण तुम्हाला तसे करण्याची गरज नसते. उकळत्या पाण्यात तुळशीची पाने टाकली तरच तुळशीचा प्रभाव चहामध्ये येतो.