Winter Fashion : कडाक्याच्या गारठ्यात साडी, नको गं बाई! या टिप्स वापरा अन् साडीतही ब्युटी क्विन दिसा

तुम्ही साडीवर डेनिम जॅकेट घालू शकता
Winter Fashion
Winter Fashionesakal

Winter Fashion :

हिवाळा सुरू झाला की प्रत्येकाच्या अंगावर फॅशनेबल नाहीतर उबदार कपडे दिसू लागतात. हिवाळ्यात गारठा अन् कडाक्याच्या थंडीमुळे वेगळी काही फॅशन करण्याचा विचार कोणी करत नाही. पण थंडीच्या सिझनमध्येच नियमित ड्युटी करणाऱ्या महिलांना मात्र सुट्टी घेऊन चालत नाही. अन् रोजच साडी, किंवा एखाद्या कार्यक्रमाला साडी नेसण्याचा विचार करत असलेल्या महिलांना काय फॅशन करावी हे कळत नाही.  

ऑफिसला जाताना काहीतरी वेगळे करून पाहणे महत्त्वाचे आहे. साडीप्रमाणेच तुम्ही हिवाळ्यातही तुम्ही वेगवेगळी स्टाईल करू शकता. यामुळे तुमचा प्रोफेशनल लुक तयार होईल आणि तुम्हाला दररोज काहीतरी वेगळे घालण्याची संधी मिळेल. थंडीच्या दिवसात ऑफिसमध्ये साडी कशी स्टाईल करायची ते आम्ही तुम्हाला सांगतो.

Winter Fashion
Paris Fashion Week 2023: 'गोल्डन गर्ल' पन्नाशीतही ऐश्वर्याचा जलवा.. पॅरिस फॅशन वीकमध्ये गोल्डन गाऊन मध्ये धमाकेदार रॅम्प वॉक

कार्डिगन आणि साडी

जर तुम्हाला फॅशनेबल दिसायचे असेल तर, तर तुमच्याकडे चांगले आणि उबदार कार्डिगन असणे महत्त्वाचे आहे. याच्या मदतीने तुम्ही साडी चांगल्या प्रकारे परिधान करू शकाल. कार्डिगनसह साडी घालण्यासाठी प्रथम ब्लाउजवर कार्डिगन घाला. त्यानंतर साडीचा पदर पिनअप करा. यामुळे तुमच्या सिंपल लुकला स्टाइलिश लुक मिळेल.

Winter Fashion
Winter Fashion Tips : हिवाळ्यात दिसायचे आहे कूल? मग, ‘या’ सोप्या टीप्सच्या मदतीने मिळवा स्टायलिश लूक

लाँग कोट

आजकाल जीन्सवरही लाँग कोट घालण्याचा ट्रेंड आहेच. तुम्ही हा लुक साडीवरही करू शकता. जर तुमच्याकडे लांब कोट किंवा जॅकेट असेल तर तुम्ही त्यासोबत साडी देखील घालू शकता. यासाठी सर्वात आधी साडी नेसून तयार व्हा. आणि त्यावर लाँग उबदार कोट घाला. यामुळे वेस्टर्न लुक तयार होईल.

Winter Fashion
Celebrity Saree Look: सणासुदीच्या काळात सेलिब्रिटींचा स्टायलिश साडी लुक ट्राय करा अन् दिसा एकदम हटके
Winter Fashion
Saree Fashion Tips : एकच साडी नेसायचा कंटाळा येतो, त्याच साडीला द्या नवा लुक, अशी नेसून पहा सगळेच कौतुक करतील

डेनिम जॅकेट आणि साडी

जर तुम्हाला साधा लुक ठेवायचा असेल तर तुम्ही साडीवर डेनिम जॅकेट घालू शकता. अशा प्रकारे तुम्ही खूप स्टायलिश दिसाल. यासाठी, तुम्ही साडी नेसल्याप्रमाणे ते परिधान करा आणि नंतर त्यावर डेनिम जॅकेट घाला. तुम्ही फक्त 10 मिनिटांत तयार व्हाल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com