
Paris Fashion Week 2023: 'गोल्डन गर्ल' पन्नाशीतही ऐश्वर्याचा जलवा.. पॅरिस फॅशन वीकमध्ये गोल्डन गाऊन मध्ये धमाकेदार रॅम्प वॉक
Aishwarya Rai Bachchan In Paris Fashion Week 2023: बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस वर्ल्ड ऐश्वर्या राय आपल्या सौंदर्यासोबतच, सिनेमातील भूमिकांमुळे देखील चर्चेत पहायला मिळते. ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकच्या 'लॉरिअल' शोमध्ये सहभागी झाली. ऐश्वर्या ही 'लॉरिअल'ची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ती पॅरिस फॅशन वीकच्या रॅम्पवर सुपर स्टायलिश लूकमध्ये दिसली.
'पॅरिस फॅशन वीक 2023' मध्ये ऐश्वर्याची वेगळी शैली चाहत्यांना पाहायला मिळाली. ऐश्वर्या रायचे या कार्यक्रमात रॅम्पवर चालतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. योवळी ऐश्वर्याने गोल्डन रंगाचा ड्रेस परिधान केला होता.
ऐश्वर्याने चा बॉडीकॉन गाऊन सी-थ्रू केपसह परिधना केला होता. आपला लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंड रिंग्ज, कानातले आणि सोनेरी हिल्स घातल्या होत्या. ऐश्वर्याने तिचे केस मोकळे ठेवले होते. तसेच तिने न्यूड मेकअप केला होता. ती या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत होती.
मोठ्या आत्मविश्वासाने ऐश्वर्याने रॅम्पवर एंट्री केली. तिच्या चेहऱ्यावर हसू होतं. तिने प्रेक्षकांकडे पाहिले आणि फ्लाइंग किसेसही दिले. तिने व्हायोला डेव्हिसचा हात धरून रॅम्प वॉक केला.
एका व्हायरल फोटोत ऐश्वर्या स्टेजवर केंडल जेनर, इवा लॉन्गोरिया, कॅमिला कॅबेलो आणि एले फॅनिंग यांच्यासोबत दिसत आहे. सध्या तिचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. नेटकरी तिच्या लूकचे खुप कौतुक करत आहे.
बच्चन कुटुंबातील एक नाही तर दोन सदस्य या कार्यक्रमाचा भाग बनले आहेत. अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाही 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये पदार्पण केले. ती 'पॅरिस फॅशन वीक'मध्ये लॉरिअल पॅरिसची कॉज अॅम्बेसेडर म्हणून पदार्पण करणार आहे. नव्याने काल तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पॅरिसमधील फोटोही शेअर केली होती, ज्यामध्ये ती पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती.
ऐश्वर्या रायच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटची मणिरत्नमच्या पोन्नियिन सेल्वन 2 मध्ये दिसली होती.