Tea And Coffee : तुम्हीही अशी करता का दिवसाची सुरवात? करत असाल, तर सावध व्हा..

सकाळच्या सवयींमध्ये आपण काही बदल केले तर तुम्ही आरोग्यदायी राहू शकता.
Tea And Coffee
Tea And Coffee

तुम्ही हे सातत्याने ऐकत असाल की, आपली सकाळ जितकी फ्रेश आणि ताजी असते. तितकात आपला दिवस कूल बनतो. जगप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि योगगुरु आचार्य प्रतिष्ठा शर्मा यांनी सकाळच्या सवयींबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यांनी काही महत्वाची माहिती सांगितली आहे. सकाळच्या सवयींमध्ये आपण काही बदल केले तर तुम्ही आरोग्यदायी राहू शकता.

व्हिडिओतून त्या सांगतात की, आपल्या दिवसाची सुरवात कधीच चहा किंवा कॉफीने केली नाही पाहिजे. त्यांनी एका अॅपवर या व्हिडिओच्या माध्यमातून काही सहजसोपे उपाय शेअर केले आहेत. या माध्यमातून एका फिट आणि हेल्दी लाइफस्टाइलचा अवलंब करू शकता. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेऊ नका असं त्यांनी सांगितलं आहे.

Tea And Coffee
World Vada Pav Day : खाता का नेता? चटपटीत वडापावची स्टोरी वाचा
https://www.kooapp.com/koo/acharyapratishthaji/725fb45c-3def-4866-a953-6e599dc825c4

चहा आणि कॉफीचा वापर तुम्ही कधीही नाश्ता म्हणून करु नका. कारण सकाळचा नाश्ता तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी मदत करतो. कधीही अंधाऱ्या खोलीत तुमची सकाळ उजाडू देऊ नका. थंड वातावरण, थंड पाणी यांचा वापर करून दिवसाची सुरवात करू नका. कधीच दिवसाची सुरवात करताना टीव्ही बघणे, मोबाईल फोन वापरणे किंवा पेपर वाचणे या गोष्टी टाळा. या सवयी दिवसाचा वेग कमी करतात आणि यामुळे आपण एकाग्रपणे कामावर लक्ष केंद्रित करु शकत नाही.

Tea And Coffee
Ganeshotsav 2022 : गणपतीला नैवेद्यासाठी तयार करा स्पेशल श्रीखंड, पाहा रेसिपी

प्रतिष्ठा शर्मा या तरुणांमध्ये अतिशय लोकप्रिय आहेत. शिवाय त्या सोशल मीडियावरही सक्रिय असतात. त्या म्हणतात की, तरुणांनी आपल्या सांस्कृतिक परंपरांचा जवळून अभ्यास केला पाहिजे. या परंपरांपासून दूर न राहता त्यांच्या अधिकाधिक जवळ गेले पाहिजे. विदेशातही भारतीय परंपरांबाबत लोक अधिकाधिक रस घेताना दिसत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com