esakal | गॅस झाला म्हणून डॉक्टरकडे गेली; 8 महिने प्रेग्नेंट निघाली
sakal

बोलून बातमी शोधा

covid-19 pregnancy

गॅस झाला म्हणून डॉक्टरकडे गेली; 8 महिने प्रेग्नेंट निघाली

sakal_logo
By
शरयू काकडे

जगात कोणासोबत काय घडेल हे सांगता येत नाही. असाचा काहीसा विचित्र प्रकार UK मधील रिवोनी अॅडम्ससोबत घडला आहे. 'द सन' च्या रिपोर्टनुसार 22 वर्षाची रिवोनीला नेहमी पोटात गॅसची समस्याचा त्रासासाठी डॉक्टरकडे गेली आणि तेव्हा तिला समजले की 8 महिने प्रेग्नेंट आहे.

गेल्या तीन वर्षांपासून ती पचनक्रिया सुधारण्यासाठी औषध घेत आहे. रोवोनीने सांगितले की, मी जेव्हा तिखट पदार्थ खाते किंवा कार्होनेटेड ड्रिंक्स पिते तेव्हा मला मळमळते, पोटावर सूज येते आणि खूप पोट दूखते. मला भूक लागणे देखील बंद होते.''

रिवोनीने सांगितले की ''सारखा सारखा त्रास जाणवू लागल्यावर मी डॉक्टरकडे जाऊन नवीन औषध घेण्याचा निर्णय घेतला. चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी जे सांगितले ते ऐकून मी शॉक होते. मी जेव्हा माझ्या त्रासाची लक्षण सांगत होते तेव्हा त्यांनी सांगितले, मी प्रेग्नेंट आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी सांगितले की मी 8 महिने प्रेग्नेंट आहे आणि डिलिव्हरी केव्हा होऊ शकते. मला एक मिनिट काहीच समजले नाही की ते काय सांगत होते. मी डॉक्टरांसोबत वाद घालत होते की असे नाही होऊ शकत कारण. मला प्रग्नेंसीची काहीच लक्षणे नाही.

रिवोनी आणि तिचा पार्टनर फिटनेससाठी खूप जागरूक आहेत. रिवोनीने सांगितले की,''मी प्रग्नेंट असल्याची शक्यता होती कारण माझे पिरियड्स मिस झाले होते. पण माझे अब्स एकदम व्यवस्थित होते. मला मॉर्निंग सिकनेस कधी जाणवला नाही, माझे वजन वाढले नाही, कमी देखील झाले नाही. त्यामुळे मी डॉक्टरांच्या मत नाकारत होते आणि वाद घालत होते. मी माझ्या पार्टनरकडे पाहिले पण तो शांतपणे उभा होता''

रिवोनीने सांगितले की, ''मी प्रग्नेंट असल्याचा मला मनात कुठेतरी आनंद होता पण मला माझ्या उगाच माझ्या अपेक्षा वाढवायच्या नव्हत्या. मला वाटत होते की, डॉक्टरांचा काहीतरी गैरसमज झाला आहे. आम्ही घरी परत जाताना मी आणि माझा पार्टनर शांत होतो. मग अचानक हसत तो म्हणाला की आता समजलं की गेल्या काही दिवसांपासून तुला चटपटीत गोष्टी खाण्याची इच्छा का होतेय.''

रिवोनी तिच्या पार्टनर सोबत 2 वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये आहे. तिने सांगितले की, ''मी 8 महिने प्रेग्नंट आहे हे मी मान्यच करत नव्हते. तुम्ही कल्पना करा की, तुम्ही डॉक्टरकडे गॅसची समस्येसाठी जाता आणि ते सांगतात की तुम्ही एका बाळाला जन्म देणार आहात. खरतरं जेव्हा मला जेव्हा प्रेग्नंसीबाबत समजले त्यानंतर मला काही लक्षणे जाणवू लागली. डिलिव्हरीमध्ये काही आठवडे बाकी आहेत आणि माझे पोट वाढत चालले आहे.''

रिवोनीने सांगितल की ती आणि तिचा पार्टनर बाळासाठी अद्याप तयार नाहीयेत. ती म्हणाली, ''करिअर, आर्थिक आणि आरोग्याच्या दृष्ष्टीने नव्या जबाबदारींसाठी मी तयार नाहीये. आम्हाला आमच्या नात्यांसाठी अजून काही वेळ द्यायचा आहे. हे सत्य स्वीकार करण्यासाठी वेळ लागला पण, आता मी प्रग्नेंसीबाबत थोडी उत्साही आहे. खरं सांगायचे तर मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी उत्सूक आहे. माझी डिलिव्हरी डेट जवळ आली आहे आणि लवकरच माझे बाळ माझ्या हातात असेल.'

loading image
go to top