esakal | शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं कसं ओळखाल?

बोलून बातमी शोधा

Oxygen Bed
शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी झाल्याचं कसं ओळखाल?
sakal_logo
By
शर्वरी जोशी

देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या विषाणूमुळे असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे कोविड सेंटर व रुग्णालयांमध्ये बेड, ऑक्सिजन सिलेंडर यांची कमतरता निर्माण होत आहे. त्यातच योग्यवेळी ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अनेक जणांचा मृत्यूदेखील झाला आहे. विशेष म्हणजे अनेक जण ऑक्सिनची पातळी खालावल्यानंतर रुग्णालयात धाव घेतात. परंतु, शरीरातील ऑक्सिजनची मात्र कमी होण्यापूर्वी शरीर आपल्याला काही संकेत देत असतं. ते वेळीच ओळखणं गरजेचं आहे. म्हणूनच शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास शरीरात कोणते बदल होतात ते जाणून घेऊयात.

हेही वाचा: व्हॉट्स अ‍ॅपची आयडिया;क्षणात मिळणार जवळच्या लसीकरण केंद्राची माहिती

ऑक्सिजन लेव्हल कमी होण्याची लक्षणे

१. शरीरातील ऑक्सिजनची लेव्हल कमी झाल्यास प्रथम ओठांचा रंग बदलतो. ओठांवर निळ्या रंगाची झाक येते. याला स्यानोसिसचं लक्षणदेखील मानलं जातं.

२. जर शरीरात ऑक्सिजनची पातळी योग्य असेल तर चेहरा गुलाबी , टवटवीत दिसतो. पण, जर ऑक्सिजन कमी झाला तर, चेहरा उतरतो.

३. छातीत अचानक दुखू लागणे.

४. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा अडथळा जाणवणे.

५. अस्वस्थ वाटणे.

६. तीव्र डोकेदुखी

७. सतत खोकला येणे.

दरम्यान, शरीरात ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यावर सामान्यपणे अशी काही लक्षणे जाणवतात. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण जाणवल्यास वेळ न दवडता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घेणे व डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध घेणं गरजेचं आहे.