Women Health : प्रसूती झाल्यानंतर पोटाची वाढलेली चरबी कमी करायची? मग रोज करा ही योगासनं

बाळंतपणानंतर वाढलेले पोट कसे कमी कराल?
Women Health : प्रसूती झाल्यानंतर पोटाची वाढलेली चरबी कमी करायची? मग रोज करा ही योगासनं

गर्भधारणेदरम्यान महिलांचे वजन वाढणे हे अगदी सामान्य आहे. प्रसूती झाल्यानंतर पोट आणि कंबरेजवळची चरबी वाढते. वजन कमी करण्यासाठी महिला अनेक प्रयत्न करतात. प्रसूतीनंतर वजन कमी करायचे असेल, तर आधी शरीराला सावरण्यासाठी वेळ द्या, मग तुम्ही योगाची मदत घेऊ शकता.

असे केल्याने तुमचे पोट कमी होईल आणि काही दिवसातच फरक दिसेल. आज आम्ही काही योगासने सांगणार आहोत. आपल्या दिनचर्येत या गोष्टींचा समावेश करून, लटकणारे पोट सहज कमी करता येते.

वसिष्ठासन

वसिष्ठासन केल्यामुळे पाठ, मांड्या, हात आणि पायांच्या स्नायुंना मजबुती मिळते. मांडीवरची, पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वसिष्ठासन करण्याचा उपयोग होतो. हे पोटाचे सर्व स्नायू घट्ट करते. त्यामुळे गर्भधारणेनंतर पोटाची चरबी कमी करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे. महिला रोज हे आसन करून पोटाची चरबी कमी करू शकतात.

दंडासन

दंडासन हे पोट मजबूत करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. हे जितके सोपे वाटते तितकेच त्याचे फायदेही आहेत. जेव्हा तुम्ही या आसनात असता तेव्हाच तुम्हाला तुमच्या पोटाच्या स्नायूंमध्ये त्याची तीव्रता जाणवू लागते.

Women Health : प्रसूती झाल्यानंतर पोटाची वाढलेली चरबी कमी करायची? मग रोज करा ही योगासनं
Yoga For Women : महिलांनो, वयाच्या तिशीनंतरही निरोगी राहायचंय? तर तुमच्या दिनचर्येत या योगासनांचा समावेश करा

नौकासन

हे योगासन नियमितपणे केल्याने केवळ पोटाचे स्नायू मजबूत होत नाहीत तर पाठीचे स्नायूही सुधारतात. हे ट्रान्सव्हर्स एबडोमिनल्स (पोटाच्या खालच्या भागात असलेले स्नायू) मजबूत होण्यास मदत करते.

जर तुम्हाला तुमच्या पोटाचे स्नायू बळकट करायचे असतील आणि पोटाची चरबी कमी करायची असेल तर हे खूप चांगले योगासन आहे.

ताडासन

हे आसन दिसायला सोपे असले तरी शरीरातील अनेक स्नायूंचा त्यात वापर केला जातो. ताडासनाच्या सरावाने शरीराची रचना सुधारते. रोज आसन केल्याने गुडघे, मांड्या आणि घोटे मजबूत होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com