Women Sex Desire: पतीला सांगितल्यास काय वाटेल? याच भावनेने महिला पतीपासून लपवतात 'या' गोष्टी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Sex Desire

Women Sex Desire: पतीला सांगितल्यास काय वाटेल? याच भावनेने महिला पतीपासून लपवतात 'या' गोष्टी

Women Sex Desire: अॅडवांस टेक्नॉलॉजीच्या काळात आजही सेक्सविषयी उघडपणे बोलणे टाळले जाते. मात्र सेक्स एज्युकेशन फार महत्वाचं आहे. अनेक महिला लग्न झाल्यावर संकोच करत बऱ्याच गोष्टी पतीला सागणं टाळतात. नेमक्या या कुठल्या गोष्टी आहेत ते जाणून घेऊया.

अंथरूणात पतीने कसं वागावं?

काही स्त्रिया या फार लाजाळू असतात. त्यांना त्यांच्या पतीला काही गोष्टी उघडपणे सांगता येत नाही. त्या बोलतानाही गोंधळतात. काही वेळा त्यांचे पती अंथरूणावर कसे वागतात हे त्यांना अजिबात आवडत नाही. अनेकदा कुठल्या एक पार्टनर जर अकाली उत्सर्ग किंवा इरेक्टाइल डिसफंक्शन (Disfunction) यांसारख्या समस्यांमुळे लैंगिक क्रिया करू शकत नाहीत. अशा वेळी जोडपं असुरक्षित होतं. (Relationship Tips)

बऱ्याचदा स्त्रियांची कामोत्तेजना अपूर्ण असते

बऱ्याचदा स्त्रियांची कामोत्तेजना अपूर्ण राहाते. पुरुषांच्या तुलनेत महिलांना क्लायमॅक्स होण्यासाठी फार वेळ लागतो. त्यांना फोरप्ले, मिठीत घेणे आवडते. मात्र बऱ्याच पुरुषांना महिलांच्या या भावनांची कल्पना नसते. पतीला वाईट वाटू नये म्हणून महिला त्यांच्या पतीला त्यांच्या मनात दडलेल्या या इच्छा व्यक्तही करत नाहीत.

महिलांना नेमका कसा सेक्स आवडतो हेही सांगण्यास त्या घाबरतात

काही स्त्रियांच्या लैंगिक इच्छा जास्त असतात. मात्र त्यांच्या पतीला त्या कळत नाही. मात्र त्यांना कसा सेक्स आवडतो त्या पतीला सांगत नाहीत. ते सांगण्याची त्यांना भीती वाटते. सांगितल्यास पती काय विचार करेल असे त्यांना वाटत असते.