
शिक्षणाची आवड मात्र समाजात मुली ओझ समजल्या जाणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने १३ वर्षी लग्नबंधनात अडकविल्या गेले. राज्य सुटले आणि गांधी विनोबांच्या भूमीचा सहवास लाभला.
Womens Day Special : पती ठरला तिच्यासाठी ‘जोतिबा’
- चेतन बेले
वर्धा - शिक्षणाची आवड मात्र समाजात मुली ओझ समजल्या जाणाऱ्या कुटुंबात जन्म झाल्याने १३ वर्षी लग्नबंधनात अडकविल्या गेले. राज्य सुटले आणि गांधी विनोबांच्या भूमीचा सहवास लाभला. पती पेशाने शिक्षक असल्याने त्यांनी शिक्षण थांबू दिले नाही. आणि त्यांनीही मिळालेल्या संधीचे सोने करीत आठ विषयात पदवी आणि एका विषयात डॉक्टरेट मिळविली.
डॉ. रत्ना दशरथ नगरे, चौधरी रा. वर्धा. असे त्याचे नाव. किशोरवयीन, महाविद्यालयीन मुलींना समुपदेशनासह पुलगाव येथे प्राध्यापक म्हणून सेवा देत आहे. डॉ. रत्ना चौधरी मूळच्या राजस्थानच्या. समजायला लागण्याच्या वयात त्यांच १४ व्या वर्षी लग्न लावून देण्यात आले. वर्धा येथी देवचंद यांच्याशी करण्यात आला. शिक्षणाची आवड मात्र लग्नानंतर शिक्षणाला थांबा मिळेल असेच वाटले. मात्र पती पेशाने शिक्षक असल्याने त्यांना शिक्षणाचे महत्त्व माहिती होते. त्यांनी शिक्षणाचे द्वार उघडले. लग्नानंतर स्थानिक यशवंत महाविद्यालयात मुक्त विद्यापीठात प्रवेश घेतला. अभ्यास करून प्रथम बीएची पदवी घेतली. मात्र ही पदवी घेताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. १५ दिवसांची बाळंतीण असताना ४५ डिग्री सेल्सीअस तापमानात बाळाला सोडून पेपर द्यावे लागले. मात्र अशा स्थितीतही हार मानली नाही. पुढे एमए. बीएड, विविध विषयात पदवी सह एका विषयात पीएचडी असा क्रम गाठला. यात बऱ्याच परीक्षा मुलीसोबत दिल्याचेही चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान त्यांनी महाराष्ट्र अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तक मंडळ पुणे, हिंदी अभ्यासगट सदस्य म्हणून २०२० पर्यंत काम पाहिले. ओपन विद्यालय पुणे, हिंदी अभ्यासक्रम सदस्य म्हणूनही काम पाहिले. आतापर्यंत त्यांना विविध सामाजिक राष्ट्रीय संस्थेकडून ३५ पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यात राज्य शासनाच्या वतीने आदर्श शिक्षक म्हणून मिळालेला सन्मान सर्वोच्च स्थानी आहे. आता महाविद्यालयात, विद्यालयात किशोरवयीन मुलींना समुपदेशनासह प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात सेवा देत आहे.
या विषयात मिळविली पदव्युत्तर पदवी
शिक्षणात आवड असल्याने चौधरी यांनी मागे वळून पाहिलेच नाही. पदवी नंतर पदव्युत्तर पदवी मिळविण्याचा सपाटाच लावला यात मराठी, हिंदी, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, तर शिक्षण विषयात एम एड. एम फिल केले. डि. व्ही जी, डि एस एम, सह शिक्षण विषयात डॉक्टरेट मिळविली.
जोतिबा मुळेच सावित्री घडली. त्याचप्रमाणे मला घडविण्यासाठी माझे पती दशरथ नगरे यांचा मोठा वाटा आहे. खरे म्हणजे पंखांना शिक्षणाचे बळ देण्याचे काम पतीने केले असून यात कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचा मोठा वाटा आहे.
- डॉ. रत्ना नगरे-चौधरी, रा. वर्धा.