Women's Day 2025 : 'या' देशांमध्ये बिनधास्त फिरू शकतात महिला, सोलो ट्रिपसाठी बेस्ट ठिकाणे घ्या जाणून

Women's Day 2024 : फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. खास करून महिलांना ग्रुपमध्ये फिरायला जायला किंवा सोलो ट्रॅव्हलिंग करायला जास्त आवडते.
Women's Day 2024
Women's Day 2024esakal
Updated on

Women's Day 2024 : फिरायला जायला तर सगळ्यांनाच आवडते. खास करून महिलांना ग्रुपमध्ये फिरायला जायला किंवा सोलो ट्रॅव्हलिंग करायला जास्त आवडते. मात्र, अनेकदा सुरक्षिततेच्या कारणांमुळे महिलांना एकट्याने प्रवास करता येत नाही.

काही महिलांना रात्री उशिरापर्यंत बाहेर राहण्याची परवानगी मिळत नाही. या सर्व गोष्टींमुळे महिलांना एकट्याने सहलीला जाण्याचा आणि नवीन ठिकाणी फिरायला जाण्याचा अनुभव घेता येत नाही.

मात्र, आज आम्ही तुम्हाला आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अशा काही ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जे महिला प्रवाशांसाठी चांगले पर्याय ठरू शकतात. विशेष म्हणजे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातूनही ही ठिकाणे महिलांसाठी अतिशय सुरक्षित आहेत.

प्रवास केल्याने आपल्याला जगाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. यासोबतच आपला आत्मविश्वास ही वाढतो. त्यामुळे, सोलो ट्रिप तर महिलांनी आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवी. चला तर मग आज आपण अशाच काही आंतरराष्ट्रीय ठिकाणांबद्दल जाणून घेऊयात जे महिलांच्या सोलो ट्रॅव्हलिंगसाठी बेस्ट ठिकाणे ठरू शकतात.

Women's Day 2024
Womens's Day Wishes 2024 : 'तिच्या' प्रतिभेला आणि कर्तृत्वाला करा सलाम! जागतिक महिला दिनानिमित्त द्या खास शुभेच्छा

आइसलॅंड

बर्फ आणि अग्नीची भूमी म्हणून या देशाला खास करून ओळखले जाते. कारण, या ठिकाणी अनेक सुंदर हिमनद्या आणि ज्वालामुखी पहायला मिळतात. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पाहायचे झाल्यास हा देश सोलो ट्रॅव्हलिंग करण्यासाठी महिलांसाठी एकदम परफेक्ट पर्याय आहे.

विशेष म्हणजे जागतिक शांतता निर्देशांकात या देशाला पहिले स्थान मिळाले आहे. या देशात आल्यानंतर तुम्ही ब्लू लगून आणि गोल्डन सर्कलसारख्या विविध ठिकाणांचा ही आनंद घेऊ शकता.

फिनलॅंड

फिनलॅंड हा देश महिलांच्या सोलो ट्रॅव्हलिंगसाठी अतिशय सुरक्षित आहे. त्यामुळे, महिला येथे बिनधास्तपणे प्रवास करायला येऊ शकतात. या देशात आल्यानंतर, सांताक्लॉज व्हिलेजपासून ते नॉर्दर्न लाइट्स पाहण्यापर्यंत अनेक रोमांचक अनुभव तुम्हाला घेता येतील.

यासोबतच येथील सुंदर तलाव, बर्फाच्छादित प्रदेश आणि निसर्गसौंदर्याची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. तुमच्या ट्रॅव्हलच्या बकेटलिस्टमध्ये फिनलॅंडचा अवश्य समावेश करा.

भूतान

भारताचा सख्खा शेजारी म्हणून ओळखला जाणारा भूतान हा देश अतिशय शांतता प्रिय देश मानला जातो. या देशात तुम्ही बर्फाच्छादित पर्वत आणि सुंदर मठांना भेट देऊ शकता. हा देश पर्वतांनी वेढलेला असल्याने या ठिकाणचा नजारा अतिशय नयनरम्य असतो. महिलांसाठी हा देश अतिशय सुरक्षित मानला जातो.

Women's Day 2024
Women's Day 2025 : जांभळा, पांढरा आणि हिरवा ‘या’ तीन रंगांचे महिला दिनाशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या याचे महत्व

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com