Women's Day 2024 : जांभळा, पांढरा आणि हिरवा ‘या’ तीन रंगांचे महिला दिनाशी काय आहे कनेक्शन? जाणून घ्या याचे महत्व

Women's Day 2024 : अवघ्या काही दिवसांवर आंतरराष्ट्रीय महिला दिन येऊन ठेपला आहे. जगभरात दरवर्षी ८ मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Women's Day 2024
Women's Day 2024esakal

Women's Day 2024 : आज जगभरात आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's day 2024) उत्साहात साजरा केला जात आहे. महिलांचा आदर, समानता, अधिकार आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक समस्यांवर जोर देण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात साजरा केला जातो. यंदा ही हा महिला दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या महत्वासोबत या दिवसाशी निगडीत असलेले खास रंग जाणून घेणे देखील महत्वाचे आहे. कोणते आहेत हे खास रंग? आणि महिला दिनासोबत त्याचे काय कनेक्शन आहे? ते आज आपण जाणून घेऊयात.

Women's Day 2024
Women's Day 2024 : मैत्रिणींनो यंदाच्या महिला दिनाला भारतातील ‘या’ ठिकाणांना करा एक्सप्लोअर, ते ही फ्रीमध्ये

महिला दिनाचे खास रंग

जांभळा, पांढरा आणि हिरवा या तिन्ही रंगांचा महिला दिनाशी खास संबंध आहे. या रंगाचा खास उद्देश देखील आहे. या तीन रंगांद्वारे हा आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रदर्शित होतो. बीबीसीच्या एका रिपोर्टनुसार, हे तीन रंग ब्रिटनच्या WSPU म्हणजेच वुमेन्स सोशल पॉलिटिकल युनियनने (Women’s Social Political Union) १९०८ मध्ये ठरवले होते.

या तीन रंगांची निवड त्यांनीच केली होती. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अभियानानुसार, यातील जांभळा रंग हा न्याय आणि सन्मानाचे प्रतिक आहे. पांढरा रंग हा शुद्धता आणि सत्याचे प्रतिक मानला जातो तर हिरव रंग हा सकारात्मक आणि आशेचा किरण मानला जातो. त्यामुळे, हे तिन्ही रंग न्याय, पवित्रता, प्रतिष्ठा आणि स्त्रियांसाठी नवी आशा यांचे प्रतिक मानले जाते. (Special Colors of Women's Day)

जगभरात असा साजरा केला जातो महिलादिन

जगभरातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, प्रत्येक देशात हा दिवस साजरा करण्याची पद्धत काहीशी वेगळी आहे.

तुम्हाला हे माहित आहे का? की, रशियासह अनेक देशांमध्ये महिला दिनानिमित्त महिलांना चक्क सुट्टी दिली जाते. या व्यतिरिक्त इटलीमध्ये मिमोसाची फुले देऊन महिलांचा सन्मान केला जातो. महिलांबद्दल आदर आणि प्रेम व्यक्त केले जाते.

अमेरिकेमध्ये दरवर्षी महिला दिनानिमित्त राष्ट्रपतींच्या हस्ते महिलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीनिमित्त विविध पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त भारतातही विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे खास आयोजन केले जाते. (how Women's Day celebrated in the world)

Women's Day 2024
Women's Day 2024 : भारतातील 'हे' शहर महिलांसाठी आहे सर्वात सुरक्षित; फिरायला गेल्यानंतर 'या' ठिकाणांना नक्की द्या भेट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com