पंजाबी ड्रेसचे पॅटर्न कोणत्याही वयात आणि कोणालाही शोभतात. अगदी ऑफिस मीटिंग असो किंवा एखादा समारंभ सर्वाचीच पहिली पसंती या ड्रेसना असते. पण, केवळ सलवार सूट हाच प्रकार यात नाही. तर, याहून असंख्य ड्रेस आहेत जे पंजाबी महिला नेहमीच वापरतात.
पंजाबी लोक पाहताच क्षणी ओळखून येतात. कारण, त्यांचे कपडे थोडे हटके असतात. त्यांच्या कपड्यांतून एक रिचनेस जाणवतो. पंजाबी महिलाही त्यांच्या सूट आणि कपड्यांच्या निवडीतून लक्ष वेधून घेतात. पंजाबी ड्रेसचे प्रकार किती आहेत याबद्दल जाणून घेऊयात.