Women’s Fashion : भरजरी महागड्या साड्यांच्या जगात या प्रिंटेड साड्यांची क्रेझ, तुमच्याकडे आहे का या साड्या?

प्रिंटेड आणि परफेक्ट बसणाऱ्या साड्यांमध्ये तरूणींना बोल्ड लुक करता येतो
Women’s Fashion
Women’s Fashionesakal
Updated on

Women’s Fashion :

भारतीय महिलांचे महावस्त्र म्हणजे साडी. बंगाली, केरळ, तामिळनाडू, गुजरात, आसाम अशा प्रत्येक राज्यातल्यांची पहिली पसंती साडीलाच असते. साड्या म्हणजे महिलांच्या जीव की प्राण असतात. साड्यांनी कपाटे भरलेली असली तरी साड्या खरेदीसाठी महिला नेहमी उत्सुक असतात.

आज आपण अशाच एका साड्यांच्या ट्रेंडबद्दल जाणून घेणार आहोत. पैठणी, शालू, कांजीवरम अशा भारीतल्या साड्या असल्या तरी प्रिंटेड आणि साध्या सुताच्या साड्याही अनेकींना आवडतात. कुठे बाहेर जायचं असलं तर या साड्या नेसून लगेच जाता येतं. त्यामुळे सध्या प्रिंटेड साड्यांनाही महिलांची पसंती आहे.

Women’s Fashion
Career In Fashion : फॅशन शोज कुठे होतात? कसे चालते काम; फॅशन दुनियेचा रंग वेगळा

प्रिंटेड आणि परफेक्ट बसणाऱ्या साड्यांमध्ये तरूणींना बोल्ड लुक करता येतो. ७० च्या दशकातील बॉलिवूड अभिनेत्री अशा साध्या पण रेखीव साड्यांमध्येच उठून दिसायच्या. आज आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या साड्यांबद्दल माहिती घेणार आहोत. ज्या तुम्हाला परफेक्ट लुक देतील.

वारली प्रिंट साडी

लेण्यांमध्ये कोरलेली की कलाकारी सध्या साडीवरही अवतरली आहे. साडीवर अशी वारली प्रिंट केली जात आहे. ही साडीवर व्यक्ती, त्या काळातील घरे, झाडे, पक्षी, डोंगर, रेखीव रांगोळी यांचे डिझाईन काढलेले असते. डार्क रंगाच्या साडीवर हे पांढऱ्या रंगाचे डिझाईन उठून दिसते. तसेच, त्याला पांढऱ्या रंगाची बारीक लेस ही असते.

वारली प्रिंट साडी
वारली प्रिंट साडी

पेपर प्रिंट साडी

ही साडी सध्या बरीच ट्रेंड मध्ये आली आहे. कारण, साडी म्हणजे पाने,फुले, पक्षी यांचे डिझाईन्स. पण, या साडीवर चक्क न्यूज छापलेल्या आहेत. फरक फक्त इतकाच आहे की ही साडी पेपरची नसून सिल्कची आहे. Black and white साडीवर काळ्या रंगाचे कॉम्बिनेशन असलेले ब्लाऊज घातले तर त्याला अधिक लुक येतो.

Women’s Fashion
Summer Fashion : को-ऑर्ड सेटचे महिलांमध्ये वाढतेय वेड, खरेदी करण्यापूर्वी अभिनेत्रींचे 'हे' लूक्स एकदा पाहा
पेपर प्रिंट साडी
पेपर प्रिंट साडी esakal

बांधणी

अनेक वर्षांपासून बांधणी साडी, बांधणी ड्रेसची फॅशन आहे. मारवाडी,गुजराती, राजस्थानमधील टिपिकल बांधणी साडी जगभरात ओळखली जाते. बांधणी साडीला हेवी बॉर्डर लावून ती पार्टीवेअरही बनवली गेली. आणि  सिंपल बांधणी प्रिंटसाडीही महिलांची तितकीच फेवरेट आहे.

फॉईल प्रिंट

सध्या काठपदर साडी आणि साधी प्रिंटेड साडी यावर फॉईल प्रिंटची डिझाईन ट्रेंडमध्ये आहे. फॉईल हे जूनेच प्रिंट आहे. पण परत याची क्रेझ आली आहे. 

Women’s Fashion
Fashion Designing Course : परदेशात जाऊन शिकायचंय Fashion Designing? तर या आहेत बेस्ट युनिव्हर्सिटीज
बांधणी साडी
बांधणी साडीesakal

फ्लॉअर प्रिंट

साड्यावर भरजरी काम असते त्यामुळे त्या सुंदर दिसतात. पण, साध्या सिंपल साड्या आवडतात अशा महिलांची पहिली पसंती फ्लॉअर प्रिंट साडीला आहे. फ्लॉअर प्रिंटमध्ये लहान-मोठ्या फुला-पानांची नक्षी साडीवर काढलेली असते.

फ्लॉअर प्रिंट साडी
फ्लॉअर प्रिंट साडीesakal

लाईन प्रिंट

सध्या लाईन प्रिंट साड्याची महिलांच्या पसंतीस उरतर आहेत. लाईन प्रिंट साड्या तरूणींना जास्त आवडत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com