
काही दशकांपासून आपल्या कानावर एड्स हा शब्द कानावर पडत आहेत. हळूहळू हा शब्द आपल्या रोजच्या वापरातील झाला आहे. कारण, दररोज या आजाराबद्दल चर्चा,बातम्या आपण ऐकत असतो. हा असा आजार आहे ज्यावर ठोस उपाय असा उपलब्ध नाही.
सुरूवातीच्या काळात जेव्हा एचआयव्ही सारख्या आजाराचे निदान लागले. जेव्हा हा आजार भारतात पसरला तेव्हा त्याबद्दलच्या काही गोष्टी बोलल्या जात होत्या. या गोष्टी अर्थहीन होत्या पण त्या काळात लोकांमध्ये एड्सबद्दलच्या अफवा पसरल्या होत्या. (World AIDS Day)