
World Environment Day: जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? यंदा करा हे 5 संकल्प
World Environment Day 2022: 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. परंतु पर्यावरण दिन साजरा करण्यामागचा मुख्य हेतू काय आहे? पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, समस्या व संवर्धनाविषयी जागरूकता निर्माण करणे आणि पर्यावरणविषयक निर्णय घेण्याची क्षमता निर्माण व्हावी, म्हणून पोषक वातावरणाची निर्मिती करणे तसेच पर्यावरणाशी संबंधित विविध विषय, घटक आणि समस्यांकडे लक्ष वेधून त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि महत्त्वाच्या बाबींविषयी तातडीने पावले उचलणे असा हा दिवस साजरा करण्यामागचा हेतू आहे.
आता पाहूया पर्यावरण दिन साजरा करायची सुरुवात कशी झाली?
पहिल्या महायुद्धानंतर मानवाच्या निसर्गावरील आघाताचे परिणाम पर्यावरण शास्त्रज्ञांच्या लक्षात आले. औद्योगिक क्रांतीच्या फळांबरोबर त्याचे दूरगामी गंभीर परिणाम मानवाला हळूहळू भेडसावू लागले. आणि त्याचे दुष्परिणाम दिसु लागले.यावर उपाययोजना करण्यासाठी अन लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी १९६० मध्ये पर्यावरणशास्त्र किंवा पर्यावरण विज्ञान हे विषय अभ्यासासाठी स्वतंत्रपणे लागू करण्यात आले.
हेही वाचा: Video - वृक्षारोपण करुन जागतिक पर्यावरण दिन साजरा
त्यानंतर जागतिक पातळीवरही पर्यावरणासंदर्भात जागृती व काम करण्याची गरज भासू लागली. हे सगळ भयावह परिस्थिती पाहुन संयुक्त राष्ट्रसंघाने १९७२ साली सर्वसाधारण सभेत पर्यावरण दिन साजरा करण्याचे ठरविले. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे ५ जून १९७४ रोजी पहिला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला आणि तिथून पुढे मग दरवर्षी ५ जूनला पर्यावरण दिन जगभर साजरा होऊ लागला.
या वर्षीच्या पर्यावरण दिनी आम्ही तुम्हाला पाच संकल्प सांगतो तुम्ही ते जर का पुर्ण केले तर त्याचे फळं तुमच्या पुढच्या पिढीला नक्की भेटेलं.
1) तुम्हाला पहिला संकल्प असा करायचा आहे की, मी माझ्या घरातून निर्माण होणारा कचरा योग्य ठिकाणी पोहचवण्याचा प्रयत्न करेल. कचरा इकडे तिकडे न टाकता तो कचराकुंडीत टाकेल. आणि घरातील कचऱ्याचे सुका कचरा व ओला कचरा अशी विभागनी करेल.
2) तुम्हाला दुसरा संकल्प असा करायचा की, माणसाचे जीवन श्वासोच्छवासाने चालते आणि श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा लागते. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनी श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा सर्वत्र पसरवण्याचा प्रयत्न करू, त्यासाठी पेट्रोल-डिझेलऐवजी ई-वाहन वापरू. आणि दैनंदिन जीवनात अधिकाधिक सार्वजनिक वाहतुकीचा वापर करु.
हेही वाचा: जागतिक पर्यावरण दिन विशेष : वृक्ष लागवडीतून झाडांनाही श्वास देऊयात
3) तुम्हाला तिसरा संकल्प असा करायचा आहे की, निसर्ग हा झाडे आणि वनस्पतींवर अवलंबून आहे. मात्र आजकाल प्रचंड वृक्षतोड वाढली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांच्या कत्तली होत आहे अन याचा परिणाम ऑक्सिजनच्या कमतरतेबरोबरच हवामानावर होऊन ऋतूचक्र चक्रही बिघडत आहे. त्यामुळे अनेक भीषण नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत आपण एक कुटुंब एक झाड ही संकल्पना राबवावी पर्यावरण दिनी एक देशी झाड लावून त्यांचे वर्षभर संगोपन करावे.
4) तुम्हाला चौथा संकल्प असा करायचा की तुमच्या अवतीभोवतीची नैसर्गिक साधन संपत्ती जसे की झाडे, रोपे, माती, माती, प्राणी, पाणी,नदी इत्यादींचा पर्यावरण स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यात महत्त्वाचा वाटा आहे. त्यामुळे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त करत पर्यावरणाचा समतोल सदैव राखला जावा, अशी प्रार्थना करा आणि पर्यावरणाचा समतोल व सुरक्षित ठेवण्यासाठी जे काही करावे लागेल, ते सर्वकाही करण्यास आम्ही सदैव तयार राहु.
5) तुम्हाला शेवटा अन पाचवा संकल्प असा करायचा की, आम्ही पॉलिथिन किंवा प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा प्रयत्न करू. पॉलिथिन आणि प्लास्टिक हे निसर्गाचे सर्वात मोठे शत्रू आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतः त्यांचा वापर करणार नाही, त्याचप्रमाणे तुम्हाला कुणी इतर पॉलिथिन किंवा प्लास्टिक वापरताना दिसले तर त्यांनाही पर्यावरणाबाबत जागरूक करु आणि शक्य होईल तेवढी नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन करु.
Web Title: World Environment Day Why Is World Environment Day Celebrated Make These 5 Resolutions This Year
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..