World Heritage Day 2024: कोल्हापूरची सुरूवात जिथून होते त्या चौकातलं तावडे हॉटेल सध्या कुठे आहे?

बाहेर गावाहून आलेला प्रवासी हॉटेलात थांबून घोटभर चहा घेऊन पुढे जायचा
World Heritage Day 2024
World Heritage Day 2024esakal

World Heritage Day 2024:

बेळगाववरून वरून येणारी असो वा पुण्यावरून येणारी बस असो, प्रत्येक कंडक्टर कोल्हापुरात आल्यावर तावडे हॉटेल चौक, कोण उतरणार असेल तर पुढे या असे ओरडतोच. तेव्हा प्रत्येकाला प्रश्न पडला असेल की इथं तर अनेक हॉटेल्स आहेत पण तावडे हॉटेल कुठेच नाही. मग, या चौकाला हे नाव का बरं पडलं?

केवळ बस कंडक्टर नाहीतर नॅशनल हायवेवरून जाणाऱ्या ट्रक ड्रायव्हरसाठीही तावडे हॉटेलचं खोपटं म्हणजे कोल्हापूर ही ओळख होती. आज हे हॉटेल अस्तित्वात नाही. ते कुठे गेलं, ते कोण चालवत होतं आणि त्यांचे वारस सध्या कुठे आहेत याबद्दल आपण आज वर्ल्ड हेरिटेज डेच्या निमित्ताने जाणून घेऊयात.

World Heritage Day 2024
Kolhapur Lok Sabha : इंदिराजींची साथ शंकरराव मानेंना नडली अन् दिल्लीत त्यांची उमेदवारी कापली, असं नेमकं काय घडलं?

तर ही गोष्ट आहे स्वातंत्रपूर्व काळातली. तेव्हा मुळचे सोलापुरकडील असलेले कदम परिवारातील शंकर आणि गिरजाबाई या दाम्पत्याने कोल्हापुरात येऊन बस्तान बसवायचे ठरवले. तेव्हा कोल्हापुरपासून जवळ असलेल्या उचगावात त्यांनी घर घेतलं. आणि  मेन चौकात त्यांनी विटांची भिंत उभारून त्यावर पाल्याचे छप्पर घातले.  

गिरजाई आणि शंकर यांना पाच मुलं आणि एक मुलगी हौसाबाई. उचगावातल्या घरात कमी आणि या खोपटात ती राहू लागली. तेव्हा पुणे बेंगलोर हा जुना हायवे होता. तेव्हा प्रत्येक ट्रक ड्रायव्हर या घराजवळ थांबून घोटभर पाणी प्यायचा आणि पुढे वाटचाल करायचा. तेव्हा येणाऱ्या वाटसरूंनीच तुम्ही इथे बिस्कीट, चहा विकायला ठेवा असे सुचवले. तेव्हा गिरजाई मुल, संसार पाहत हे हॉटेल चालवू लागल्या. त्यातून उदरनिर्वाहही होत होता त्यामुळे पोटाचे हाल थांबले.

World Heritage Day 2024
Kolhapur Lok Sabha : मुख्यमंत्र्यांची शिष्टाई फळाला येणार का? नाराजी दूर करण्यातच महायुतीची ताकद खर्च

याच कामाला वाढवत पुढे त्या हॉटेलमध्ये भजी, वडा पावही मिळू लागले. तेव्हा बाहेर गावाहून आलेला प्रवासी हॉटेलात थांबून घोटभर चहा घेऊन पुढे जायचा. काही प्रवासी घाईत काहीही न खाता चौकात येऊन बससाठी थांबायचे. तेव्हा इथे पोटभर नाश्ता करून ते पुढे मार्गस्थ व्हायचे.गिरजाईंची मुलं मोठी झाली,त्यांची लग्नही तिथेच झाली. पाचही सुना या हॉटेलच्या कामात मदत करू लागल्या.

जेव्हा पुरेसे पैसे मिळू लागले तेव्हा तावडे हॉटेलपासून जवळ असलेल्या लोहार मळ्यात हे बस्तान हलवलं. सध्या गिरजाई आणि शंकर यांची तिसरी पिढी इथे राहत आहे.

World Heritage Day 2024
Kolhapur Crime : एक लाखासाठी आईनेच पोटच्या मुलीला गोव्यात विकलं; काय आहे प्रकार? मध्यस्थाला अटक

गिरजाईंचे पणतू आणि केरबा आणि आनंदी यांचा मुलगा अशोक तावडे सांगतात की, या हॉटेलमुळे आमची एक वेगळी ओळख आहे. हॉटेलमुळे त्या काळात आमच्या आजोबांनी पैसेच नाहीतर माणसेही कमावली. जी आजही भेटून आम्हाला आजोबा-आज्जींबद्दल चांगल्या गोष्टी अनुभव सांगतात.

पुढे ते म्हणाले की, हॉटेल सुरळीत सुरू होतं आम्ही ते अजून डेव्हलप करण्याचा विचार करत होतो. तेवढ्यात सरकारी फर्मान निघालं. कोल्हापूर शिरोली नाका ते गांधीनगर फाटा रस्ता चौपदरी झाला आणि त्या रस्त्याखालीच २००३ साली तावडे हॉटेलच्या खोपटाचा शेवट झाला.

सध्या या चौकात अनेक हॉटेल आहेत. चहाच्या टपऱ्या आहेत, पण यातही लोक आमच्या हॉटेलबद्दल बोलतात, चौकशी करतात हे आमच्यासाठी समाधानकारक आहे,असेही ते म्हणाले.     

तावडे हॉटेल आज अस्तित्वात नाही. मात्र, त्याची ओळख जोवर कोल्हापूर आहे तोवर राहील एवढं मात्र नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com