World Lupas Day 2024 : महिलांच्या शरीरावर दिसणारी सूज असू शकते या गंभीर आजाराची चाहूल, जाणून घ्या Lupas आजाराबद्दल

हा आजार लहान वयातील मुलींमध्येही आढळतो
World Lupas Day 2024
World Lupas Day 2024 esakal

World Lupas Day 2024 :

आज जागतिक लुपस दिवस आहे. लुपस हा एक आजार असून तो शरीरातील रोगप्रतिकारशक्तीमुळे होते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच अवयवांवर हल्ला चढवते. तेव्हा लुपस विकाराची लागण होते. हा एक वातरोग असून पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये जास्त आढळतो.  

गांभिर्याची गोष्ट म्हणजे हा आजार लहान वयातील मुलींमध्येही आढळतो. चेहऱ्यावर फुलपाखराच्या आकाराचे लाल चट्टे (बटरफ्लाय रॅश) येणे सुरू होते हे या विकारांचे प्रमुख लक्षण आहे.

World Lupas Day 2024
Health Care : अल्ट्रा प्रोसेस्ड पदार्थांच्या सेवनाने मृत्यूचा धोका लवकर वाढतो; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर

ल्युपस नक्की काय आहे?

ल्युपस हा एक स्वयंप्रतिकार आजार आहे, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशींना आजारी पाडते. यामुळे सांधे, स्नायू, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि मेंदू यासह अनेक अवयवांमध्ये सूज आणि वेदना होऊ शकतात. हा आजार महिलांमध्ये जास्त दिसून येतो. अशा स्थितीत त्याची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे.

World Lupas Day 2024
Health Care : ‘एसी’ ची हवा घेताय..! थोडी आरोग्याचीही काळजी घ्या

या गंभीर आजाराची लक्षणे कोणती आहेत?

  • महिलांमध्ये टक्कल पडणे

  • हातांच्या बोटांचा रंग निळा, काळा होणे

  • हृदय वा फुफ्फुसात पाणी जमा होऊन धाप लागणे

  • सांधे दुखणे-सुजणे व अकडणे

  • वारंवार ताप येणे

  • चेहेऱ्यावर लाल चट्टे येणे

  • केस गळणे

  • डोकं दुखणे फिट येणे

  • पक्षाघात होणे मानसिक आजार

या आजारापासून दूर रहायचे असेल तर इतकं केलंच पाहिजे

शरीरासाठी आरोग्यदायी ठरतील अशाच गोष्टींचे सेवन करा

आयुष्यभर व्यायाम आणि योगासनांचा दिनक्रम ठेवा

धूम्रपान आणि अल्कोहोलचे सेवन टाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com