
जागतिक पालक दिवसाचा इतिहास आणि महत्व
पालकांच्या त्यांच्या मुलांप्रती असलेल्या वचनबद्धतेची प्रशंसा करण्यासाठी दरवर्षी १ जून रोजी जागतिक पालक दिन साजरा केला जातो. युनायटेड नेशन्सने म्हटल्याप्रमाणे, जागतिक पालक दिवस ही जगभरातील पालकांना त्यांच्या 'मुलांप्रती निस्वार्थ बांधिलकी आणि या नातेसंबंधाचे पालनपोषण करण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची संधी आहे.
पालकांना त्यांच्या मुलांचे सर्वांगीण संगोपन करण्यात मदत करण्यासाठी कुटुंबांना काय आवश्यक आहे याकडे हा दिवस मुख्य लक्ष वेधतो. पालक दिवस हा निस्वार्थ पालकांचे उत्सवाचा सोहळा आहे ज्यांनी आपल्याकडे असलेले सर्व काही आपल्या लेकरां देण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.
जागतिक पालक दिवसाचा इतिहास
संयुक्त राष्ट्रांनी 1980 साली कुटुंबांशी निगडित समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली.
कमिशन फॉर सोशल डेव्हलपमेंटने, 1983 मध्ये, यूएन सरचिटणीस यांना कुटुंबातील मुख्य समस्या आणि कुटुंबातील गरजा यावर अभ्यास करुन उपाय शोधुन त्याची सार्वजनिक आणि कायदेकर्त्यांमध्ये तरतूद करुन समाजात जागरूकता वाढवण्याची विनंती केली.
पुढे डिसेंबर 1989 मध्ये, यूएन जनरल असेंब्लीने ठराव 44/82 अंतर्गत 1994 हे कुटुंब आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले. त्यानंतर युनायटेड नेशन्सने आपल्या या मिशन अंतर्गत,1 जून हा जागतिक पालक दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा केली.
जागतिक पालक दिवसाचे महत्त्व
पालक हे मुलांकरता मायेचे, आधाराचे, प्रेमाचे ,चांगल काय वाईट काय यांची समज देणारे आणि मुलांकरता एक संरक्षणाची ढाल असतात .
कोरोना काळांपासुन तर पालकांवर आणखी जबाबदाऱ्यांचा भार पडला आहे कारण त्यांना स्वतःला आणि त्यांच्या लेकरांचे दोघांचे ही कोरोनापासुन संरक्षण करणे, तसेच मुलांच्या शैक्षणिक सामाजिक बौध्दिक कक्षा कशा रुंदावतील यावर विशेष भर दयावा लागत आहे.
सार्वजनिक ठिकाणी जातांना काय काळजी घ्यावी हे लहान मुलांना समजून सांगणे खुप मोठी तारेवरी कसरत होती .
मुलांची काळजी घेणे, कामाच्या ठिकाणी आणि घरी त्यांच्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडणे .अशा अनेक गोष्टी एकाच वेळी पालकांना कराव्या लागल्या.
पालकांनी त्यांच्या मुलांच्या कल्याणासाठी केलेले त्याग आणि वचनबद्धतेवर प्रकाश टाकुन त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जागतिक पालक दिवस साजरा केला जातो.
Web Title: World Parents Day History And Importance
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..