
धनतेरस, किंवा धनत्रयोदशी ही आश्विन महिन्याच्या १३ व्या दिवशी असते. या दिवशी देवांचा वैद्य धन्वंतरी याचा जन्म झाला. म्हणून या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात. काही लोक या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करतात.
दिवाळी सण असताना धनत्रयोदशीस एक आगळेवेगळे स्वरूप येते. व्यापारी वर्गात या पूजेचे महत्त्व विशेष असते. या दिवशी संध्याकाळी दुकानांमध्ये पूजा केली जाते. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याचा प्रघात आहे. या दिवशी यमदेवांसाठी दिवा लावण्याची प्रथा आहे. त्यामागे काय कथा आहे हे जाणून घेऊयात. (Yam Deep Daan 2024)
आश्विन वः।। १३ पासून कार्तिक शुक्ल २ पर्यंत जो महोत्सव सबंध भारतात मोठ्या थाटाने साजरा केला जातो तो दीपावली किवा दिवाळी या नांवाने प्रसिद्ध आहे. शास्त्रोक्त रीत्या दिपवाळीचा उत्सव तीन दिव- सांचा आहे, तथापि बलिप्रतिप्रदा व यमद्वितीया याची देखील या महोत्सवात गणना केली जाते. या पांचही दिवसांची नावे निरनिराळी असून प्रत्येक दिवशी करीव धार्मिक विधी उरकण्यात येतो. पहिला दिवस आहे धनत्रयोदशीचा.
पुराणात या दिवसाला महत्त्व आहे. कारण, ज्या शिवाय मनुष्य जगू शकत नाही. त्या धन म्हणजे पैसे अन् सोन्या-चांदीचा हा दिवस. काही लोकांसाठी धनाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. काही लोक धन म्हणजे आरोग्य समजतात. तर काही सोने-नाणे यालाच धन मानतात. (Dhanteras 2024)
धनत्रयोदशीचा सण धनतेरस म्हणूनही ओळखला जातो. या दिवसाच्या उत्सवासंबंधाने पुराणांतरी एक विलक्षण कथा सापडतेः- प्राणि- मात्राच्या जीविताची मुदत संपताच त्यांचे प्राण हरण करणाऱ्या यमधर्माने एकदा आपल्या दूतांस विचारिले की, यमपाश घालून प्राण हरण करण्याचे कार्य करीत असता तुम्हाला कोणाची दया आली होती काय ?
दूत म्हणालेः- एकदा हंस नांवाचा राजा अरण्यात मृगयेस गेल्यावेळी आपल्या राजधानीपासून फार लांब गेला. तेथून तो जवळ असलेल्या हैम राजाच्या वाडयात विश्रांतीसाठी आला. त्याने त्याचा उत्तम परामर्श घेऊन त्यास संतुष्ट केले. या वेळी हैम राजाला पुत्र झाल्यामुळे तो मोठ्या आनंदात होता.
या दिवशी षष्ठीदेवीचा उत्सव होता. देवीने स्त्रीरूप धारण करून राजाला असे कळविले की या मुलाचे लग्न होताच चौथ्या दिवशी तो सर्पदंशाने मरण पावेल. राजास अत्यंत वाईट वाटून त्याने अपमृत्यु टाळण्यासाठी काही दैविक उपाय योजले. हंसराजाला है भविष्य ऐकून वाईट बाटले हैमराजाच्या मुलाचा अपमृत्यु चुकविण्याचा त्याने पतकर घेतला व
यमुनेच्या डोहाच्या मध्यभागी एक सुंदर प्रासाद बांधून त्यात त्या मुलास ठेवले. यथाकाली एका सुस्वरूप राजकन्येशी त्याचा विवाह झाला. हा समारंभ थाटाने चालला असता चौथ्या दिवशी राजपुत्राला सर्पदंशाने मरण आले. त्या वेळी त्याचे प्राण हिरावून घेण्याचा प्रसंग आह्मां दूतांवर आला. याबद्दल आम्हास अत्यंत वाईट वाटले. कारण अशा आनंदोत्सवाच्या वेळी हा अनर्थ कोसळलेला पाहून आह्माला दया आली.
हा प्रसंग कोणावरही येऊ नये असे आपण कराल तर फार उपकार होतील. दूतांचे हे भाषण ऐकून यमधर्म म्हणाले, 'दूतहो, आश्विन कृष्ण १३ पासून पांच दिवस प्रत्यहीं प्रदोषकाली सर्व ठिकाणी जो दीपोत्सव करील त्याला तुमच्या इच्छेप्रमाणे अपमृत्यु येणार नाही.