

Gen Z Career Trends 2025 | Job Hugging to Conscious Unbossing
sakal
Gen Z Career Mindset: 2025 वर्ष संपायला आता दोनच आठवडे बाकी राहिले आहेत. या वर्षी Gen Z ने बऱ्याच गोष्टींमध्ये बदल घडवले आहेत. मैत्री आणि कुटुंबातील नाती, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, मानसिक आरोग्य, ऑफिस कल्चर, करिअर आणि यशाच्या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टिकोन हे सगळेच बदल केले.
त्यातच आर्थिक अनिश्चितता, AI चा वाढता प्रभाव, मोठ्या प्रमाणात नोकरकपात आणि मानसिक आरोग्यविषयक वाढलेली जागरूकता या सगळ्यांचा थेट परिणाम कामाच्या पद्धतींवर आणि आपल्या आयुष्यावर देखील झाला.