Yoga For Stomach Problems : पोटात सतत गॅस होतोय? मग, 'ही' योगासने आहेत फायदेशीर, जाणून घ्या सरावाची पद्धत

Yoga For Stomach Problems : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे.
Yoga For Stomach Problems
Yoga For Stomach Problemsesakal

Yoga For Stomach Problems : निरोगी जीवनशैलीसाठी संतुलित आहार आणि नियमितपणे योगा करणे फायदेशीर आहे. योगामध्ये विविध योगासनांचा समावेश आहे. विविध समस्यांसाठी तुम्ही या योगासनांची मदत घेऊ शकता. परंतु, या योगासनांचा दररोज सराव करणे महत्वाचे आहे.

कधीकधी आपल्यासमोर एखादी आवडीची डिश आली तर, आपल्याला त्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. आपण तो पदार्थ चवीने आणि आवडीने खातो. उत्साहाच्या भरात तो पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ला जातो. आपल्या भूकेपेक्षा हा पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यामुळे, पोटाशी संबंधित अनेक समस्या सुरू होतात.

जसे की, पित्त होणे, पोटात पेटके येणे, आम्लपित्त, पोटात गोळा येणे इत्यादी समस्या सुरू होतात. या समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही अतिखाणे टाळायला हवे आणि अशा स्थितीत योगाची मदत घ्यायला हवी. पोटाच्या या समस्या अन् अ‍ॅसिडिटी दूर करण्यासाठी तुम्ही काही योगासनांची मदत घेऊ शकता. कोणती आहेत ही योगासने चला तर मग जाणून घेऊयात.

Yoga For Stomach Problems
Yoga For Sleep Problems : झोपेच्या समस्या दूर करण्यासही फायदेशीर आहे योगा; 'या' आसनांचा होईल फायदा

बुद्धकोनासन

पोट आणि किडनीचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी हे योगासन फायदेशीर आहे. ज्या लोकांना नेहमीच पोटाच्या आणि किडनीच्या समस्यांचा त्रास संभवतो. त्या लोकांनी या योगासनाचा नियमितपणे सराव करणे फायद्याचे ठरते. पोटात सतत गॅस होणे, पित्त होणे इत्यादी समस्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही या योगासनाचा तुमच्या फिटनेस रूटीनमध्ये जरूर समावेश करावा. सर्व वयोगटातील व्यक्ती या आसनाचा सराव करू शकतात.

हे योगासन करताना सरळ रेषेत मांडी घालून बसा. तुमच्या दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना जोडून घ्या आणि दोन्ही हातांनी तुमच्या पायांची बोटे पकडा. आता बोटांना पकडून हळूहळू तुमचे डोके बोटांजवळ नेऊन टेकवण्याच प्रयत्न करा. या स्थितीमध्ये तुमचे शरीर ताठ असायला हवे, याची काळजी घ्या.   

वृक्षासन

वृक्षासन हे योगासन अतिशय फायदेशीर मानले जाते. मानसिक शांतीसाठी आणि शारिरीक आरोग्यासाठी या योगासनाचा दररोज सराव करणे फायदेशीर आहे. या आसनाचा नियमितपणे सराव केल्याने मणक्याची हाडे मजबूत होण्यास मदत होते. हे योगासन करायला अतिशय सोपे आहे. सर्व वयोगटातील व्यक्ती हे योगासन करू शकतात.

हे आसन करताना सर्वात आधी सरळ उभे रेषेत उभे राहा. त्यानंतर, तुमचा उजवा पाय डाव्या पायाच्या मांडीवर ठेवा आणि दोन्ही हात डोक्याच्या वरच्या दिशेने न्या आणि नमस्काराच्या स्थितीत हात जोडा. आता याच स्थितीमध्ये ३० ते ३५ सेकंद उभे राहा. तुम्हाला संपूर्ण शरीरात ताण जाणवेल. या योगासनाच्या नियमित सरावामुळे तुम्हाला ॲसिडिटीच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

Yoga For Stomach Problems
Yoga For Healthy Skin : हेल्दी आणि ग्लोईंग त्वचेसाठी फायदेशीर आहेत ‘ही’ योगासने, जाणून घ्या सरावाची पद्धत अन् फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com